क्रीडा कार्यालयाकडून शाळा अस्तित्वात नसतांनाही २१ लाख रुपयेचे वाटप ?

जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी म.न.पाच्या शाळा अस्तित्वात नसतांनाही साहित्यांसाठी लाखो रुपयांची केली अफरातफर ?

रंगाबाद प्रतिनिधी अस्तित्वात असणाऱ्या  मनपा शाळेत अजून मंजूर झालेले  क्रीडा साहित्य  पोहोचले नाही  क्रीडा विभागाचे कार्यालय भ्रष्टाचाराचे कुरण बनलं आहे. कारण  शहरात मनपा शाळा चक्क चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे, औरंगाबादच्या सात मनपा शाळा शहरात दिसत नाही या सात शाळांना  जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी तब्बल एकवीस लाख रुपये रकमेचे क्रीडा साहित्य  यासाठी प्रत्येकी तीन लाखांचा निधी मंजूर  केला  आहे. ही कामे कागदोपत्री दाखवले असल्याची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत.याविषयी आमच्या हाती असे पत्र लागले आहे कि  महानगरपालिका औरंगाबाद शिक्षण अधिकारी यांनी ज्या शाळा अस्तिवात नाही त्यांना  क्रीडा विकास अनुदान अंतर्गत  क्रीडा साहित्य मंजुर करण्यात आले आहे.ज्या ठिकाणी शाळा आहे त्या ठिकाणी साहित्य मंजुरी दिली नाही. असे पत्रा द्वारे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास कळवले आहे.

    तसेच चौकशी समिती हि लवकरच औरंगाबाद येथे दाखल  होणार आहे.याकरिता पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस शाम भोसले यांनी क्रीडा आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना चौकशी करण्याकरिता दि .७ डिसेंबर २०२१ रोजी पत्राद्वारे मागणी  केली आहे .यामध्ये त्यांनी औरंगाबाद येथील जिल्हा क्रीडा कार्यालयाने सन २०२० -२१ अनुदानातून सुमारे ४ कोटी ६० लाख रुपयांचे क्रीडा साहित्य खरेदी केले आहे . क्रीडांगण विकास या योजनेतून सुमारे ३ लाखांचे साहित्य देण्यात येते त्यामध्ये क्रीडा प्रकार दिले आहे परंतु जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे शासन निर्णयात नमूद नसलेल्या क्रीडा साहित्य खरेदी करून शासनाच्या निधीचा दुरुपयोग केला आहे तसेच औरंगाबाद महानगरपालिकेच्या काही शाळा अस्तित्वात / कार्यरत नसतांना अंदाजे ८ ते ९  शाळांना क्रीडा अधिकारी कार्यालयाने अनुदान मंजूर केले आहे यामुळे प्रशासन आणि शासनाची दिशाभूल झाली आहे संबंधित अधिकारी व त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींना कायदेशीर कारवाई करावी असे पत्राद्वारे भोसले यांनी मागणी केलीआहे .

अस्तित्वात / कार्यरत नसलेल्या  सात शाळा

१.मनपा शाळा क्रांतीनगर  उस्मानपुरा

२.मनपा के.प्रा.शा.  उर्दु इंदिरानगर

३.वार्ड क्र.१३ भिमनगर उत्तमनगर मनपा शाळा

४. वार्ड क्र.०८ सुरेवाडी मनपा शाळा

५. वार्ड क्र.११  विश्वासनगर हर्षनगर  मनपा शाळा

६. वार्ड क्र.०७ मयुरपार्क मनपा शाळा

७.मनपा शाळा एन -६ सिडको

ठाकरे सरकार आहे का ?

    कविता नावंदे यांच्याविरुद्ध पत्रकार तथा अधिवक्ता दिगंबर वाघ यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून चौकशी करण्याबाबत विनंती केली होती या पत्रामध्ये क्रीडा मार्गदर्शक असताना शासनाच्या पूर्व परवानगी शिवाय निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेतल्याबद्दल तसेच सातारा जिल्हा येथील स्वयंसिद्धाचे टेंडर स्वतः टाकून शासनाची दिशाभूल केली. सातारा प्रकरणामध्ये मी कायम स्वरूपी कर्मचारी नसून प्रतिज्ञापत्र दिले असून जिल्हा क्रीडा अधिकारी प्रमाणपत्र लावले आहे  ते चुकीचे असून त्यात सहा वर्षाचा अनुभव असताना ते या जिल्हा क्रीडा अधिकारी पदास पात्र होवू शकत नाही.तरी आज शासनाची दिशाभूल करून शासन सेवेत नोकरी जबाबदार पदावर कार्यरत आहे.एमपीएससी(MPSC) जिल्हा क्रीडा अधिकारी या पदासाठी सहा वर्षाचा अनुभव लागतो तो कालावधी नसताना खोटे सर्टिफिकेट लावून नोकरीस लागलेल्या आहे. क्रीडा खात्याचे ओ.एस.डी स्वतःकडे असताना औरंगाबाद जिल्ह्यात बदली करून घेतली.अशा विविध प्रकरणाचे पुराव्यानुसार पत्र देण्यात आले असून सुद्धा निलंबित करण्याचे आदेश देण्यात दिरंगाई  का करत आहे. ठाकरे सरकार आहे का ? असा प्रश्न क्रीडा संघटन आणि खेळाडूंच्या  मनात निर्माण झाला  आहे.

रात्रीस खेळ चाले

    तसेच औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुल गारखेडा येथील जिल्हा क्रीडा कार्यालयाची न्यायालयीन सुमोटो याचिका चालू असताना कविता नावंदे यांनी विभागीय क्रीडा संकुल येथील दुरुस्तीच्या नावाखाली रात्रीमध्ये रूमच्या भिंती तोडून अनेक ठिकाणी उदा. केबिन प्रशस्त स्वरुपात करून  घेण्यात आली. नेहमी प्रमाणे यावेळेस  देखील आपल्या सुखसोयींकडे लक्ष केंद्रित केले. यावेळी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांनी कोणत्या कारणास्तव परवानगी दिली आहे.न्यायालयीन सुमोटो  केस चालू असताना तोडफोड करता येते का?  असे क्रीडा जगतात कुजबुज सुरु आहे  विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी हे  कविता नावंदे यांना ? बर आश्रय देत आहे असा प्रश्न निर्माण होत आहे.अजूनही  राज्य क्रीडा मंत्री सुनील केदार नावंदेला निलंबित करण्याचे आदेश देण्यात दिरंगाई का करत आहे. भ्रष्टाचारी क्रीडा अधिकारी यांना  पदावरून निलंबीत करत नाही असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र  क्रीडा जगता मध्ये निर्माण झाला आहे .याच बरोबर कविता नावंदे यांना कोण पाठीशी घालत आहे हे पण सर्वांसमोर  येणे  महत्वाचे आहे.  आता बदली नाही  थेट निलंबन  करण्यात यावे असा क्रीडा प्रेमींमध्ये आक्रोश  निर्माण होत आहे.

▶️ कवित नावंदे यांची शासकीय सेवेत नियुक्ती झाल्यापासून आतापर्यंतची कारकीर्दतच वादग्रस्त असल्यामुळे यांना कोण पाठीशी घालीत आहेत. विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी,क्रीडा आयुक्त, प्रधान सचिव क्रीडा विभाग हे यांना का निलंबित करित नाही ? यांनी न्यायालयाचा सुद्धा अवमान केला असून वरील सर्व अधिकारी हे न्यायालया पेक्षा  वरिष्ठ (मोठे) झाले आहेत ? यावर यांनी तात्काळ खुलासा करावा. -दिगंबर वाघ पत्रकार तथा अधिवक्ता मुंबई

▶️ या सात मनपाच्या शाळा  अस्तित्वात / कार्यरत नाही. असे स्पोर्ट्स पानोरामाने उपसंचालक क्रीडा व युवक संचनालय पुणे अनिल चोरमले यांना  संपर्क केला असता असे म्हणाले कि  सध्या या चौकाशीची व्याप्ती वाढली आहे .आम्ही संपूर्ण चौकशी झाल्यावर  याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला कळवू -अनिल चोरमारे उपसंचालक

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८