कविता नावंदे यांची नार्को टेस्ट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार ? -को.वि.प.सं मुंबई

विता नावंदेंचा चौकशीनंतर कागदपत्रे सावरासावर करण्याचा प्रयत्न झाला का ? उपसंचालक उर्मिला मोराळे यांनी पंचनामा करून दस्तऐवज रूमला सील करण्यात आले

रंगाबाद प्रतिनिधी :  क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांची औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी या कार्यालयात चौकशी समितीचे कामकाज झाल्यानंतर आज दि.९ जानेवारी रोजी (रविवार)शासकीय सुट्टी असतांना क्रीडा अधिकारी कार्यालयातील पी .एस .चव्हाण या कार्यालयात कागदपत्रे पाहणी करण्या करिता आले होते .असे समजताच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय विभागीय क्रीडा सकुल गारखेडा परिसर येथे स्पोर्ट्स पॅनोरमा दाखल झाले.

    यानंतर उपसंचालक मोराळे तात्काळ पोहचण्यापूर्वी  पी.एस .चव्हाण याठिकाणी दाखल झाले होते .त्यानंतर काहीक्षणातच उपसंचालक मोराळे याठिकाणी दाखल होऊन कार्यालयाची पाहणी केली .काहीक्षणातच जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेंची एन्ट्री झाली पत्रकार  याठिकाणी दाखल असलेले बघून  त्या संतापून बोलल्या “पत्रकार माझे म्हणणे न ऐकता माझ्या विरोधात बातम्या टाकत आहेत तसेच माजी क्रीडा अधिकारी  राजाराम दिंडे   यांचा फोटो काढून दाखवण्यात आला तसेच याप्रसंगी गोकुळ तांदळे याठिकाणी उपस्थित असतांनाही त्यांचे नाव का घेण्यात आले नाही”या विषय वारंवार पत्रकारांनी बाजू मांडून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही असे त्यांना सांगितले . त्यानुसार त्यांची बाजू ऐकून याविषयी उपसंचालक मोराळे यांना नावंदेंच्या समोरच विचारणा केली कि , राजाराम दिंडे हे कोणत्या साली सेवानिवृत्त झाले व तुम्ही त्यांना याठिकाणी बोलावले आहे का ? तर उपसंचालक म्हणाल्या  मे २०१९  मध्ये  दिंडे हे सेवानिवृत्त झालेले आहेत आणि मी त्यांना याठिकाणी चौकशी दरम्यान बोलावले नाही. त्यानंतर चौकशी अधिकारी या नात्याने तुम्ही तांदळे यांना याठिकाणी बोलावले का ? असे मोराळे यांना विचारले. तर त्या म्हणाल्या तांदळे  हे अधिकारी नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत चौकशी  करता  त्यांना याठिकाणी बोलावले होते.

     या कार्यालयात चौकशी समिती चे कामकाज झाल्यानंतर आज ९ जानेवारी २०२२ रविवार शासकिय सुट्टी असताना क्रीडा अधिकारी कविता नावांदे या कार्यालयातील कागदपत्र पाहणी करीत आहे हे समजल्यावरुन उपसंचालक उर्मिला मोराळे यांनी संपर्क करून त्वरीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात पंचनामा करून संपुर्ण चौकशी होत नाही तो पर्यंत  हे कार्यालय सील करावे व आजतागायातचे सर्व सी.सी.टि.व्हि. फुटेज ताब्यात घ्यावे व सुट्टीच्या कालावधीत क्रीडा अधिकारी पी.एस .चव्हाण याठिकाणी दाखल ? होतात आणि संबंधित अधिकारी यांची हि चौकशी करावी.अशी मागणी करत आहे.

▶️ सुट्टीच्या दिवशी क्रीडा अधिकारी पी .एस .चव्हाण उपस्थित ? होते 

    नावंदेंना विचारणा केली कि क्रीडा अधिकारी चव्हाण याठिकाणी उपस्थित कसे ?तर त्या म्हणाल्या  पुरेसे मनुष्यबळ आणि अतिरिक्त तीन अधिकाऱ्यांचा कामाचा भार त्यांच्यावर असल्यामुळे मी त्यांना याठिकाणी सुट्टीच्या दिवशी येण्यास परवानगी दिली .कार्यालयीन दस्तावेज घरी घेऊन जाण्यास परवानगी दिली यानंतर क्रीडा अधिकारी कार्यालयाचे काही दस्तावेज ज्याठिकाणी  ठेवण्यात आले होते त्या ठिकांणची चावी  सुट्टीच्या दिवशी उपलब्ध नसल्यामुळे ते उपसंचालक उर्मिला मोराळे यांच्याद्वारे सील करण्यात आले.

▶️कविता नांवदे यांची ऐवडी वादग्रस्त कारकिर्त असतानासुद्धा यांच्यावर निलंबनाची कारवाई का होत नाही यांची नार्को टेस्ट करावी यासाठी मुख्यमंत्री व क्रीडामंत्री यांच्याकडे मागणी करणार त्यामुळे यांनी शासनाचे आतापर्यंत किती कोटी रुपयांचे नुकसान केले याबाबत कळेल. -दिगंबर वाघ सरचिटणीस को.वि.प.सं मुंबई

▶️ मंत्री सुनील केदार यांना चौकशी रद्द करण्यासाठी दम वजा इशारा दिला ?

    चौकशी टाळण्यासाठी थेट मंत्रालयात धडक व्यायामशाळा साहित्य घोटाळा प्रकरणी सुरू असलेली चौकशी त्वरित थांबवावी यासाठी संबंधित अधिकारी कविता नांवदे थेट मंत्रालयामध्ये क्रीडा मंत्र्यांकडे बुधवारी पोहोचल्या होत्या त्यातच त्यांनी औरंगाबाद येथे आपल्या कार्यालयात रजेचा अर्ज किंवा याबाबत वरिष्ठांना कोणतीही पुर्व कल्पना न देता थेट मंत्रालयात धाव घेतली व दुपारपासूनच भेटीसाठी थांबुन मंत्री सुनील केदार यांना चौकशी रद्द करण्यासाठी आदेश दिला.ऐवडी बनावट दस्तऐवज सापडले असून सुद्धा चौकशी रद्द करा हे कसे ?

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८