जे,ड व ब प्रभागातील टप-यांवर निष्कासनाची धडक कारवाई !
ल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार 4/जे प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आज  लोकग्राम नाल्याजवळील बगिचाच्या आरक्षित भूखंडावर असलेल्या 35 अनधिकृत टपऱ्या निष्कासनाची धडक कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी महानगरपालिका पोलीस कर्मचारी व 1 जेसीबीच्या सहाय्याने केली.

    त्याचप्रमाणे 5/ड प्रभागाच्या सहा. आयुक्त सविता हिले यांनी कल्याण पूर्व खडेगोळवली येथील फुटपाथवरील दुकानांचे वेदरशेड हातगाड्या बाकडे पिंजरे व इतर अशा एकूण 38 अतिक्रमणांवर निष्कासनाची धडक कारवाई आज केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस व 1 जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली.

    ब प्रभागातही सहा. आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी कल्याण‍ पश्चिम साई चौक येथील 2 पत्र्याची दुकाने, गोदरेज हिल रोड वरील 2 शेड रिंग रोड गांधारी सर्कल येथील 3 शेड अशी एकूण 7 अतिक्रमणे निष्कासनाची कारवाई आज अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी महापालिका पोलिस व 1 जेसीबीच्या सहाय्याने केली.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८