वेळापत्रक बाह्यरूग्ण विभागात दर्शनी भागात लावण्याची शिवसेनेची मागणी.

वैद्यकीय अधिकारी तंत्रज्ञ यांच्या कामाचे वेळापत्रक बाह्यरूग्ण विभागात दर्शनी भागात लावण्याची शिवसेनेची मागणी. 

न्नड प्रतिनिधी  :(संभाजीनगर) औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहरातील ग्रामीण रूग्णांलय व ट्रामा सेंटर येथे शहरी व ग्रामीन भागातील येणारे वयवृद्ध गरोदर महीला अपघात झालेले पेंशट यांची हेळसांड होऊ नाही.करीता वैद्यकीय अधिकारी व तंज्ञ यांच्या कामाचे वेळापत्रक बाह्यरूग्ण विभागात दर्शनी भागात लावण्याची मागणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख चंद्रकांत लाडे यांनी निवेदना द्वारे वैद्यकीय अधिक्षक यांच्याकडे केली.कार्यरत वैद्यकीय अधिकारी विषेशतंज्ञ उपचार  देण्यासाठी कोणत्या दिवशी हजर असतात यांची  येणाऱ्या रूग्णांना (पेंशटला)  माहिती होत नसल्याने पेंशटची हेळसांड होत आहे  रूग्णांना बालरोग तंज्ञ अस्तीव्यंग तंज्ञ भुलतंज्ञ श्रीरोग तंज्ञ कोणत्या दिवशी हजर असतात यांची माहिती मिळाल्यास त्यांना उपचार घेणे सोईचे होईल ग्रामीन रुग्णालय येथे सतत एकच वैद्यकीय अधिकारी हजर असतात बाकी त्यांच्या सोयीप्रमाणे कामकाज करतात.

    त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात येणारे वयवृद्ध गरोदर महीला तसेच अपघातातील विशेषता ग्रामीन भागातील रूग्णांची हेळसांड होते तात्काळ वैद्यकीय अधिकारी यांना आपल्या स्तरावरुन सुचना व पत्र देऊन हजर राहण्यास सांगण्यात यावे तसेच रुग्णालय कार्यालयीन कामकाज आपल्या कार्यालयाच्या वतीने देण्यात येणारे प्रमाणपत्र जसे अंपग प्रमाणपत्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र इत्यादी कार्यालयाच्या बाहेर दर्शनी भागात लागणारी शुल्क (पैसे) बोर्ड लावण्यात यावा जेणे करून रूग्णांना व रूग्णांचया नातेवाईकांना किती शुल्क (पैसे) भरायची यांचा बोध होईल अशी कार्यवाही तातडीने करावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने गोरगरीब जनतेच्या हितासाठी ढोल ताशे आदोलन करण्याचा ईशारा शिवसेनेचे उपशहर प्रमुख चंद्रकांत लाडे शिवसेना महीला उपशहर संघटक अनिताताई लाडे यांनी दिला.


दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८