संजय राऊत यांना चौकशीसाठी ईडीने घेतले ताब्यात !

मुंबई प्रतिनिधी : आताची महत्वाची बातमी समोर येत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. संजय राऊतांची आज सकाळपासून चौकशी सुरु होती. राऊतांविरोधात चौकशी करण्यासाठी दिल्लीहून ईडीचे पथक आले होते, अशी माहिती समोर आली असता संजय राऊत यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.

    पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांची तब्बल ९ तास राऊत यांची चौकशी सुरू होती, चौकशीत संजय राऊत हे सहकार्य करीत नसल्याचे सांगून ईडीने पूढील तपासाकरिता   ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशीसाठी त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात येणार आहे.ईडीच्या कारवाईनंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या घरी असलेल्या छाप्यांवरून टीका करताना म्हटलं की, ही दमनशाही, दडपशाही सुरू आहे.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८