ठोकपगारी वाहनचालक कायम कधी होणार ?

केडीएमसी मधील ठोकपगारी वाहनचालक कायम होण्यासाठी ते अनाथ झाले आहेत मुख्यमंत्री त्यांचे नाथ होणार ?

ल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागांमध्ये कचरा वाहून नेण्यासाठी २०१२ मध्ये तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी नियमाप्रमाणे ठोकपगारी वाहनचालकांची भरती केली २०१२ अगोदर कचरा उचलण्याचे काम हे ठेकेदारामार्फत चालले होते. ठेकेदारा कचरा उचलत नसल्याने नागरिकांच्या अनेक वाढत्या तक्रारीवरून ठेका रद्द करून तत्कालीन आयुक्त सोनवणे यांनी ठोकपगारी वाहनचालकांची भरती केली यांना एक वर्षानंतर कायम करणे अपेक्षित होते परंतु आयुक्त सोनवणे यांची बदली झाली आणि वाहनचालकांना ग्रहण सुरू झाले ते आजपर्यंत संपवण्याचे नाव घेत नाही.

   त्यानंतर वाहनचालकांनी वारंवार येणाऱ्या आयुक्तांच्या भेटी घेऊन निवेदन दिले आम्हाला कायम करा परंतु आज पर्यंत असे झाले नाही. काही उपायुक्तचे हट्ट न पुरवठ्यामुळे यांनी यांना कामावरून कमी करण्याचा घाट घातल्यामुळे या सर्व १०५ वाहनचालकांनी औद्योगिक न्यायालयात २०१५ साली गेले. त्यानंतर या न्यायालयाचा निकाल सप्टेंबर-ऑक्टोबर २०१९ साली आला या सर्व वाहनचालकांना कायम सेवेत सामावून घेण्याबाबतचा निकाल देऊन सुद्धा असे झाले नाही. न्यायालयाचा आदेश मान्य नसेल तर अपिल करण्यासाठी मुदत दिली होती परंतु मनपाने या मुदतीचा मान ठेवला नाही किंवा त्या विरोध आजपर्यंत अपिल सुध्दा केले नाही किंवा यांना कायम करण्यात आले नाही. या विरोधात असे की यांना मिळत असलेले वेतन ही वेळेवर दिले जात नाही त्यामुळे यांच्यावर अनेक वेळा उपासमारीची वेळ आली होती. याबाबत मनपा प्रशासन या वाहनचालकांच्या एवढे विरोधात ? आहेत हेच कळत नाही. वेळ प्रत्येकावर येते, आज ही वेळ या वाहनचालकांवर आहे भविष्यात यांच्यातील काही अधिकाऱ्यांवर ही येऊ शकते.

    या वाहनचालकांनी २०१९ मध्ये दिलेल्या आदेशावर २०२१ साली अवमान याचिका दाखल केली यानंतर तत्कालीन आयुक्त डॉ.सूर्यवंशी यांना तीन वेळा समस काढून सुध्दा सुर्यवंशी हे कोर्टासमोर हजर झाले नाही. वाहनचालकांनी सूर्यवंशी यांना भेटून सांगितले की आम्हाला कायम करा. आपण कोर्टात ही येत नाही आपणास कोर्टाने तीन वेळा समस काढले आहेत परंतु आयुक्त सांगतात मला एकही समस मिळाले नाही. मनपाचा विधी विभाग आयुक्तांना ? कळवत नाही यामागे नेमके काय चालू आहेत.

  एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर या वाहनचालकांनी त्यांच्याकडे धाव घेतली परंतु यांना मुख्यमंत्री भेटले नाही. त्यांचे चिरंजीव खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी भेट दिली व संपूर्ण विषय समजून घेतला आणि तात्काळ विद्यमान आयुक्त डॉ.दांगडे यांना फोन करून यांचा विषय मार्गी लावण्यासाठी सूचना केल्या. या वाहनचालकांनी लगेच आयुक्त दांगडे यांची भेट घेतली आयुक्तांनी यांना भेटून आश्वासन दिले की मला यावर अभ्यास करावा लागेल. आजपर्यंतचा इतिहास आहे की येणाऱ्या प्रत्येक आयुक्तांनी या पलीकडे दुसरे कोणतेही उत्तर ? देत नाही. अभ्यासपूर्ण होईपर्यंत यांच्या बदलीचा पुढील आदेश येतो मग हे आयुक्त जेव्हा बदली होऊन मनपामध्ये दाखल होतात तेव्हा चार्ज कशाचा घेतात चार्ज घेते वेळी यांना ही सर्व प्रकरणे माहित असणे अपेक्षित आहेत किंवा नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

* १०५ वाहनचालकांचा आक्रोश

१) मुख्यमंत्री साहेब आपण उठाव केला याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आम्ही कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्याचा निर्णय घेऊ शकत नाही कारण मनपा प्रशासन आम्हाला कामावरून कमी करण्याची एकप्रकारे धमकीच देते.

२) आम्ही यापुर्वीही आपणास व खासदार साहेबांना भेटून आमच्या व्यथा सांगितल्या होत्या परंतु आम्हाला आपल्या अनेक भाषणांमधून आता कळले की आपल्याला कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता परंतु आता परिस्थिती बदलली असून आपण राज्याचे प्रथम नागरिक झाले आहात या नात्याने आम्हाला आता तरी न्याय मिळेल ?

३) आम्ही सर्व १०५ ठोकपगारी वाहनचालक सध्या कायम सेवेत सामावून घेण्यासाठी अनाथ झालो आहेत.. आपण आमचे नाथ होऊन आम्हाला न्याय देणार ? एवढी आमची आपल्याला मनापासून प्रार्थना आहेत.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८