अकार्यक्षम राज्य महिला आयोग समिती बरखास्त करा..

महिलांना न्याय देण्यास असमर्थ ठरलेल्या निष्क्रिय राज्य महिला आयोग समिती बरखास्त करा. -किस्किंदा पांचाळ यांची मागणी 

मुंबई  प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य महिला आयोग समिती महिलांना न्याय मिळवून देण्यास असमर्थ असुन केवळ राजकीय हेतुने किंवा एखाद्या राजकीय पक्षाची मालकीहक्क असलेली  राज्य महिला आयोग समिती बरखास्त करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तथा विश्वकल्याण महिला सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष किस्किंदाताई पांचाळ यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदनाद्वारे केली असून मुख्यमंत्री महोदयांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

आझाद मैदानात २ महिन्यापेक्षा ज्यास्त दिवस आमरण उपोषण करून सुद्धा भेट घेऊन दखल घेतली नाही महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर - किस्किंदाताई पांचाळ 

    बीड जिल्ह्य़ातील महाराष्ट्र महिला आयोग समिती सदस्य संगीता चव्हाण यांनी केलेली महिलांची आर्थिक फसवणूक तसेच अन्य गैरव्यवहार प्रकरणात चौकशी करून नियमानुसार आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी किस्किंदा पांचाळ यांनी आझाद मैदान मुंबई येथे २५ एप्रिल २०२२ ते २४ जुन २०२२ पर्यंत सलग २  महिन्याहून अधिक दिवस त्या नंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले म्हणून आंदोलनला स्थगितदिली 22 ऑगस्ट पासून स्थगित आंदोलन पुन्हा सुरू २५ ऑगस्ट २०२२ पर्यंत आंदोलन करून सुद्धा राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी भेट घेण्याचे टाळले तसेच राजकीय पक्षाच्या असल्याने संगीता चव्हाण यांच्यावर कारवाई करता येणार नाही असा निरोप त्यांच्या सचिवांच्या हस्ते पाठवला एकंदरीतच सर्व सामान्य महिलांसाठी सध्याची राज्य महिला आयोग समिती काम करत नसुन राजकीय पक्षाची खाजगी मालकी असल्याप्रमाणे वागत असुन तो तात्काळ बरखास्त यावी अशी पांचाळ यांनी मागणी करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री महोदयांचा सकारात्मक प्रतिसाद 

    मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना सध्याची राज्य महिला आयोग समिती बरखास्त करण्याची मागणी संदर्भात किस्किंदाताई पांचाळ  लेखी निवेदन देत असताना एकनाथजी शिंदे यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकाला विचारलें आपल्याला हे करायचंच होतं कसं काय राहीलं असं विचारत निवेदनावर शेरा मारला त्यामुळे किस्किंदा पांचाळ यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८