भिवंडी तहसीलदार अधिक पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाची धडक कारवाई..

अनधिकृत वाढीव बांधकामे केलेले ४९ गोदामे केले सील !

भिवंडी प्रतिनिधी रुण पाटील : भिवंडी तालुक्यातील विविध ग्रामपंचायत हद्दीत राज्य शासन व एमएमआरडीए ची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे झाली असून तर काही ठिकाणी उभारण्याचे काम सुरू आहेत, या परिसरात काही ठिकाणी विकासक परवानगी पेक्षा अधिक बांधकामे सुरु आहेत. सदर गोदामे अधिकृत करून घेण्यासंदर्भात शासनाने व महसूल विभागाने सूचना केल्या आहेत.

    शासनाने सूचना देऊन सुद्धा नियमांचे पालन केले जात नाही त्यामुळे या गोदाम संकुलांवर ठाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्या आदेशानुसार भिवंडी तहसीलदार अधिक पाटील यांच्या नेतृत्वा खाली अनधिकृत गोदामे सील करण्याची मोहीम महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली असुन ४९ गोदाम सील करण्यात आली आहेत. जर ही गोदामे शासन शुल्क भरून अधिकृत करण्यात आली नाही तर ती तोडून टाकण्यात येईल असा इशाराही तहसीलदार अधिक पाटील यांनी दिला आहे.त्यामुळे परिसरातील विकासकां मध्ये प्रचंड खळबळ माजली आहे.भिवंडी तालुक्यात राज्य शासन व एमएमआरडीए कडून बांधकाम व्यावसायिक बांधकाम विकास परवानगी न घेता अथवा घेतलेल्या विकास परवानगी पेक्षा अधिक बांधकाम करून विकासक गोदामे बांधत असल्याने शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे अनधिकृत व अधिक क्षेत्रावरील बांधकाम नियमित करून घेण्यासाठी शासनाने आदेश निर्गमित केले आहेत .

          सदर अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या कडे अर्ज करणे आवश्यक असून त्या बाबत अनधिकृत बांधकाम धारकांना तीन वेळा नोटीस बजावून ही बांधकामे नियमित करण्यास टाळाटाळ केली जात असल्या कारणाने अशी ५२५ गोदामे सील केली जाणार असून कारवाई सुरू केल्याची माहिती तहसीलदार अधिक पाटील यांनी दिली.

   या कारवाईत नायब तहसीलदार गोरखनाथ फडतरे सर्व मंडळ अधिकारी,तलाठी, कोतवाल हे या कारवाईत सहभागी झाले होते. या कारवाई नंतर ही अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत बांधकाम धारकांनी व बांधकाम विकासकांनी स्वारस्य न दाखविल्यास अशी अनधिकृत बांधकामे तोडून टाकण्याची कारवाई केली जाईल असा इशारा तहसीलदार अधिक पाटील यांनी दिला आहे. प्रत्येक गोदामा सील करीत असताना ते गोदाम निर्मनुष्य करणे गरजेचे असल्याने तेथे काम करणाऱ्या कर्मचारी, कामगार वर्ग यांना ही कारवाई करीत असताना बाहेर काढणे गरजेचे असल्याने या कारवाईस वेळ लागला असला तरी दोन दिवसात सुमारे ४९ गोदाम सील करण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८