एकल प्लास्टिक वापरकर्त्यांकडून केला रुपये १५०००/ दंड वसूल !

नकचरा विभागाच्या उपायुक्तांनी ब प्रभाग परिसरात समक्ष केली पाहणी एकल प्लास्टिक वापरकर्त्यांकडून केला रुपये १५/  दंड वसूल !

ल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण  : महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार ,घनकचरा विभाfगाचे उपायुक्त अतुल पाटील आणि स्वच्छता निरीक्षक धात्रक व त्यांच्या पथकाने ब प्रभाग क्षेत्र परिसरातील साई चौक, गोदरेज हिल ,खडकपाडा परिसर या  परिसरात पाहणी करून एकल प्लास्टिक वापरणाऱ्या तीन फेरीवाल्यांकडून  प्रत्येकी रु. 5000/-याप्रमाणे रु.15000/- दंड वसूल केला त्याचप्रमाणे उघड्यावर कचरा टाकणारे नागरिक/ व्यापारी यांच्यावर दंडात्मक कारवाई करत त्यांचे कडून एकूण रु. 1300/- इतका दंड वसूल केला.

    कल्याण डोंबिवली महापालिका परिसरात एकल प्लास्टिक वापर व साठवणुकीवर तसेच उघड्यावर कचरा टाकण्यास बंदी घालण्यात आली आहे. एकल वापर प्लास्टिक बंदी अंतर्गत पहिल्यावेळी रू. 5000/-  दुसऱ्या वेळी रु.10000/-  व तिसऱ्या वेळी रु. 25000/- इतकी दंडात्मक कारवाई तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल अशी दंडात्मक तरतूद आहे, त्यामुळे पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी नागरिकांनी सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळावा आणि महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महानगर पालिकेच्या घनकचरा विभागामार्फत करण्यात येत आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८