छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कळसांबडे येथे होणार भव्य स्मारक

आदिती तटकरे यांनी कळसांबडे गावच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी १० लाखाचा निधी उपलब्ध करून दिला.

ळा प्रतिनिधी पुनित खांडेकर : आध्यात्मिक वारसा जपणाऱ्या कळसांबडे गावात शिवस्मारका साठी ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने आदिती तटकरे यांनी आमदार निधीतून १० लाख रुपये उपलब्ध करून दिले.

छत्रपती शिवरायांना स्मरून आपल्या राजकीय जीवनाची घोडदौड करतांना आपल्या वडिलांच्या म्हणजेच खा.सुनील तटकरे यांच्या समाज सेवेचा वारसा जपत असताना आदिती तटकरे नेहमीच आपल्याला जनसमुदायात मिसळताना बघायला मिळतात.त्यांच्या कडे समाजातील कोणीही व्यक्ती गेले असता तो निराश होऊन परतल्याचे कधीच ऐकायला येत नाही अशी कुजबूज तळा तालुक्यात आणि कार्यकर्त्यात नेहमीच ऐकायला मिळते.आपल्या गावात शिवस्मारक व्हावे या सद्दइच्छेने कळसांबडे गावच्या कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी आमदार असलेल्या आदिती तटकरे यांच्या कडे स्मारकासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली . आध्यात्मिक वारसा जपणाऱ्या कळसांबडे गावात शिवस्मारका साठी आदिती ताई तटकरे यांनी आमदार निधीतून १० लाख रुपये उपलब्ध करून दिले. या निधीसाठी उत्तमजी जाधव देवा रामाणे, किशोर शिंदे, प्रवीण अंबारले आणि कळसांबडे गावातील युवकांनी पुढाकार घेतला.लवकरच शिवस्मारक होईल अशी माहिती देवा रामाने यांनी दिली आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८