अखेर मुंबई उच्च न्यायालयात अनिल देशमुखांना जामीन मंजूर !
भिवंडी प्रतिनिधी अरूण पाटील : अखेर मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांना जामीन मंजुर केला आहे. देशमुखांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला दिले होते. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यात त्यांना जमीन मंजूर झाला.आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामीनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली .सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गेल्या आठवड्यात न्यायालयाने राखून ठेवलेला निर्णय दुपारी जाहीर केला. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अनिल देशमुख यांना शंभर कोटी कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केली होती.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या याचिकेची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला देशमुखांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. त्या नुसार उच्च न्यायालयात न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सलग सुनावणी सुरू होती.देशमुखांविरोधात तपास यंत्रणेकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. त्यामुळे त्यांची अटक अयोग्य असल्याचा दावा देशमुखांच्या वतीने करण्यात आला आहे. त्यानंतर अटक योग्य आणि कायद्याला धरूनच असल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयकडून युक्तीवाद करण्यात आला.तसेच वसुली आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रकरणातही देशमुखांनी हस्तक्षेप केल्याचा दावाही ईडीने केला आहे. तसेच, अनिल देशमुख यांना जामीन देण्यात येऊ नये, असेदेखील ईडीच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला होता. तेव्हा दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता.
मुंबईतील बार रेस्टॉरंट मालकांकडून शंभर कोटीची वसुली करण्याचे आदेश सचिन वाझे यांना देण्यात आले होते. असे खळबळजनक पत्र माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पाठवल्यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास सीबीआयने करावी, अशी विनंती वकील जयश्री पाटील यांनी केली होती . या प्रकरणात सीव्हीआरए गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात सीबीआयने मुख्य आरोपी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे, खाजगी सचिव संजीव पालांडे, कुंदन शिंदे आहे.मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला १oo कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होते असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता.
यानंतर निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक (API ) सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याच प्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.