कन्नड तालुक्यातील करंजखेड येथील भोईदेव यात्रे निमित्त बैठक संपन्न...

करंजखेड येथील भोईसमाजाचे अराध्य दैवत भोईदेव उर्फ ताऊबा महाराज संस्थान च्या वतीने बैठक संपन्न -चंद्रकांत लाडे उप शहर प्रमुख शिवसेना

न्नड प्रतिनिधी : कन्नड तालुक्यातील करंजखेड येथील अनेक वर्षीपासूनची प्रथा व परंपरा नुसारद्विसालाप्रमाने या वर्षी करंजखेड ता.कन्नड जि संभाजी नगर येथील महाराष्ट्रातील भोईसमाजाचे अराध्य दैवत भोईदेव उर्फ ताऊबा महाराज यांची यात्रा भरणार आहे.   भोईसमाजातील अंत्यत तपस्वी ताऊबा महाराजांनी उर्फ भोईदेवांनी आपल्या तपाने अनेक चमत्कार कार्य केले आहे. त्यांची करंजखेड ता.कन्नड येथील गावाजवळील गट न.1025 येथील वडाच्या झाडाखाली समाधी घेतली आहे. आजही भाविक यात्रे निमित्त त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने जमतात व समाधीचे दर्शन घेतात भाविकांना भोईदेव प्रसंन्न होऊन भाविक भक्तांच्या मनोकामना पुर्ण होतात म्हणुनच संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष स्व.के.बी.वानखेडे यांनी 1996 मध्ये शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे तसेच तत्कालीन मुख्यमंत्री मा.मनोहर जोशी यांना दर्शन व मार्गदर्शनासाठी आनले होते.

    करंजखेड येथे 9डिसेंबर रोजी भोईदेव यात्रा होणार असुन 10 डिसेंबर रोजी कुस्ती दंगल होणार आहे या अनुषंगाने चर्चा करण्यात आली अशी माहिती भोईसमाज मराठवाडा अध्यक्ष तथा शिवसेना उप शहर प्रमुख चंद्रकांत लाडे यांनी दिली.   

   तिर्थ स्थळाच्या यादीत समाविष्ट असलेले महाराष्ट्रातील भोईसमाजाचे अराध्य दैवत भोईदेवाचे एकमेव देवस्थान आहे महाराष्ट्रातील तमाम भाविकांना दर्शन घडावे यासाठी भोईदेव उर्फ ताऊबा महाराज संस्थान च्या वतीने बैठक घेण्यात आली. या वेळी सचिव बाबासाहेब ढोले, विजय वानखेडे, ज्ञानेश्वर वानखेडे, गंगाराम वानखेडे, विश्वनाथ वानखेडे, तोताराम केसापुरे, लक्ष्मण वानखेडे, नामदेव वानखेडे एकनाथ वानखेडे, भगवान वानखेडे, शाम वानखेडे, आदींची उपस्थिती होती.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८