उपमुख्यमंत्र्यांची जनरल ॲटोमिकच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा

जर्मनीचे महावाणिज्य दूत अचिम फॅबिग यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

मुंबई प्रतिनिधी : जर्मनीचे मुंबईतील महावाणिज्य दूत अचिम फॅबिग यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली.उपमुख्यमंत्री फडणवीस आणि फॅबिग यांच्यादरम्यान यावेळी महाराष्ट्रातील गुंतवणुकीसंदर्भात चर्चा झाली. जर्मनीमधील उद्योजकांनी राज्यात अधिकाधिक गुंतवणूक करावी, राज्य शासनामार्फत त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

    येत्या सहा महिन्यांत जर्मनीतील उच्चस्तरीय शिष्टमंडळ महाराष्ट्रात भेट देणार आहेत. या शिष्टमंडळांना राज्याच्यावतीने सहकार्य करावे, अशी अपेक्षा फॅबिग यांनी व्यक्त केली. त्यांचे राज्यात स्वागतच होईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वस्त केले.

उपमुख्यमंत्र्यांची जनरल ॲटोमिकच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनरल ॲटोमिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक लाल यांनी सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.बैठकीत जनरल ॲटोमिक कंपनीचे भारतात विस्तारीकरण करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर आण्विक ऊर्जा आणि ड्रोन या विषयांमध्येही जनरल ॲटोमिकने जागतिक स्तरावर राबविलेल्या योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

    उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री यांचे सचिव  डॉ. श्रीकर परदेशी आणि विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८