महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवनियुक्त सदस्यांनी घेतली शपथ

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी राज्यपालांकडून नियुक्त करण्यात आलेले डॉ. अभय एकनाथ वाघ आणि डॉ. सतीश माधवराव देशपांडे यांना आज आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला आयोगाचे सदस्य डॉ. प्रताप दिघावकर सचिव डॉ. सुवर्णा खरात यांच्यासह आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    अध्यक्ष निंबाळकर यांनी नवीन सदस्यांचे स्वागत करून त्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामकाजाबाबतची माहिती दिली. मार्च 2023 पर्यंत सरळ सेवा आणि राज्य सेवा परीक्षांच्या मुलाखती पूर्ण करण्याचे लक्ष्य आयोगाने ठेवले असून याबाबतही निंबाळकर यांनी सदस्यांना माहिती दिली. डॉ. दिघावकर यांनीही यावेळी नवीन सदस्यांना मार्गदर्शन केले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८