उसतोडणी कामगारांचा कर्तुत्वाचा सत्कार

कन्नड शहरातील शिवसेना उप शहर प्रमुख चंद्रकांत लाडे यांचा आनोखा उपक्रम..

न्नड प्रतिनिधी : कन्नड साखर कारखान्यात उन वारा न बघता कारखाना सांगेल त्या गावी जाऊन ऊस तोडणीचे काम करणाऱ्या ऊस तोडणी कामगाराचा कन्नड शहरातील उद्धव बाळासाहेब  ठाकरे शिवसेना उपशहर प्रमुख चंद्रकांत लाडे  शिवसेना महिला विभाग संघटक अनिता लाडे यांनी सत्कार करून कर्तुत्वाची थाप या ऊस तोडणे कामगारांना  दिली. 

   अनेक वर्षा पासून ऊसतोडणारे मजुर मी बघत आलो आहे. सकाळी थंडी आसो वारा आसो हे मजुर आपली बैल गाडीवर आपले कुटुंब  घेऊन उसाच्या फडात पाच वाजे पर्यंत पोचून कारखान्याला उस पोचवण्याचं काम करतात कधी रस्त्यावर गाडी पंचचर झाली  तर तीथेच थांबून  रात्र रात्र जागून हे काम करतांना आम्ही बघीतले आहे  अचानक पीशोर रोड चौधरी पेट्रोल पंपाच्या थोडसं पाठीमागे हे ऊस तोडणी कामगार आज शेवटचा दिवस आहे म्हणून रंगरंगोटी करताना दिसले त्यांना ज्या वेळेला विचारले त्यांनी सांगितले का आज आमचा या गटामध्ये शेवटची ट्रिप आहे त्यांनी छान पैकी बैलांची रंगरंगोटी केलेले होते.

   उसाच्या वरती उसाच्या वाड्याने नारळाचे फांद्या सूर्यफुलाचे झाड असे चित्रीकरण  केले होते जणू काही लग्नालाच जायचं की काय अशी तयारी त्या ठिकाणी चालू  होती आपले कुटुंब आपली जिम्मेदारी या उद्देशाने आम्ही या ऊस तोडणी कामगारांचा छोटा  खानी कर्तुत्वाची थाप म्हणून त्यांना फेटे बांधून शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार त्या  ठिकाणी केला त्यावेळेस फेटे बांधणाऱ्यांनी विचारणा केली की साहेब आज पर्यंत वीन वरती कोट वरती फेटे बांधलेत परंतु आज कष्ट करणारे अंगावर मळलेले कपडे फाटलेले कपडे अशांना फेटे बांधण्याचा आम्हाला योग आला आज खऱ्या कष्टाचा मोल आपल्यामुळे या मजुरांना मिळाला आहे हिवाळ्यामध्ये तसेच थंडीचा बचाव होण्यासाठी शोटरची  व्यवस्था कारखान्याने  पुरवण्याची गरज आहे  अशी भावना त्यावेळी त्यांनी व्यक्त केली.

    त्यावेळी ऊस तोडणी कामगार दिलीप राठोड, पंडित राठोड, ज्ञानेश्वर चव्हाण रंजीत चव्हाण राजू वाघ शरद भिवसने कल्पना भिवसने विकास राठोड रेखा राठोड सविता राठोड छाया राठोड गीता चव्हाण मंदा वाघ, नेहा चव्हाण, तसेच मुकादम कैलास लाडे व  ऊस तोडणी मजुरांचा सत्कार करून कर्तुत्वाची थाप देण्याचा उपक्रम शिवसेना उपशहर प्रमुख चंद्रकांत लाडे शिवसेना महिला विभाग संघटक आणि लाडे ह्यानी  करून आदर्शाचा संदेश दिला आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८