मुंबई प्रतिनिधी : रायगड-अलिबाग येथील कुटुंब न्यायालयाच्या कार्याचा विस्तार पेण-मुरूड तालुक्याच्या क्षेत्रापर्यंत करण्यात आला आहे. यामुळे या क्षेत्रातील रहिवाशांची कौंटुबिक प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होण्यास सहकार्य लाभणार आहे.
राज्य शासनाने उच्च न्यायालयाशी विचारविनिमय करून, रायगड-अलिबाग कुटुंब न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या स्थानिक मर्यादा, पेण व मुरूड तालुक्याच्या संपूर्ण क्षेत्रापर्यंत वाढविल्या आहेत. या न्यायालयाच्या अधिकारितेच्या स्थानिक मर्यादा अलिबाग नगरपालिका क्षेत्राच्या मर्यादेशी समकक्ष तसेच तालुक्याच्या संपूर्ण स्थानिक सीमांतर्गत क्षेत्राशी तसेच मुरूड तालुक्याच्या संपूर्ण स्थानिक सीमांतर्गत क्षेत्राशी समकक्ष असतील, असे विधी व न्याय विभागाने अधिसूचनेद्वारा कळविले आहे.
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८