इपसार येथे पहिल्यांदा दीक्षांत समारंभ उत्साहात साजरा

र्जत प्रतिनिधी : कर्जत जिल्हा रायगड येथे असलेल्या इपसार (IBSAR) ग्रुप ऑफ कॉलेज मध्ये दीक्षांत समारंभ अतिशय थाटात संपन्न झाला यावेळी पदवी मिळालेले अनेक विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली यामध्ये कायद्याची (L.L.B.) पदवीसह बी.एम.एस. बी.एस.सी. आय.टी.बी.आय. या अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्या मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.

   असा कार्यक्रम इपसार(IBSAR) ग्रुप ऑफ कॉलेज येथे पहिल्यांदाच ठेवण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मिसेस मोंगा या होत्या त्यांच्यासोबत कॉलेजच्या डायरेक्टर ॲड.विनिता पुंदिर डॉ. मोंगा अविनाश निरगुडकर दिनेश मते प्रतीक दांडेकर संजय दिघे शबाना सिद्दिकी आणि इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

   या दीक्षांत समारंभात सप्तरंग वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक दिगंबर वाघ यांना कायद्याची (L.L.B) पदवी प्रदान करण्यात आली याप्रसंगी डॉ मोंगा यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले हा कार्यक्रम अतिशय उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला.

   अविनाश निरगुडकर यांनी या कार्यक्रमासाठी अतिशय मेहनत घेतली असून यांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८