जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मंत्रालयात तंबाखूमुक्तीची शपथ

मुबई  प्रतिनिधी  : जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी यांना त्रिमूर्ती प्रांगणात तंबाखूमुक्तीची शपथ दिली.

   सामाजिक न्याय विभाग व नशाबंदी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यसनमुक्ती सापसिडीचे  आयोजन करण्यात आले होते. तंबाखू नियंत्रण कायद्याची माहिती दर्शविणारे कटआऊट, पोस्टर्स, पत्रक  मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात लावण्यात आले होते. नशाबंदी मंडळ व आरोग्य आयुक्तालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्ताने राज्यस्तरीय ऑनलाईन पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

   यावेळी सामाजिक न्याय विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच मंत्रालयातील इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८