वक्फ मालमत्ता ऑनलाईन नोंदणीसाठीच्या वेबपोर्टलचा शुभारंभ-मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री

मुबई प्रतिनिधी : वक्फ मालमत्तांची ऑनलाईन-नोंदणी करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या वेब-पोर्टलचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वेबपोर्टलचा शुभारंभ झाला. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्यांसह खासदार इम्तियाज जलील फौजिया खान वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहद मिर्झा सदस्य समीर काजी, मुदस्सीर लांबे आदी उपस्थित होते.

   महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ हे कार्यालय औरंगाबादला असून राज्यातील वक्फ मालमत्तांशी संबंधित प्रकरणांच्या अनुषंगाने राज्यभरातील वक्फ संस्थेच्या प्रतिनिधींना औरंगाबाद येथे जावे लागते. ही अडचण दूर व्हावी व वक्फ मालमत्तांशी संबंधित कामकाज ऑनलाईन पध्दतीने करण्याची सुविधा निर्माण व्हावी या हेतूने एक संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम विभागाने हाती घेतले. त्यानुसार आता ऑनलाईन-नोंदणी ची सुविधा https://mahawaqf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८