डबेवाल्यांना ही लागले वारीचे वेध..

टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ती चालावी पंढरीची.

मुंबई प्रतिनिधी अनुरागवार : संताच्या पालख्यां पंढरीच्या वाटेला लागल्या आहेत.वारीत सहभागी होण्यासाठी तसेच पंढरपुरात पांडूरंगाचे दर्शन घेण्याची आस डबेवाल्यांनाही लागली आहे.डबेवाला कामगार मुंबईत जरी काम करत असला तरी त्याची वारी कधी चुकली नाही म्हणुन मुंबई डबेवाला असोशिएशन या संस्थेला मानणारे डबेवाले कामगारांनी वारीला जाण्यासाठी एक दिवसाची रजा जाहीर केली आहे. 

  त्यामुळे त्यांनी आपली सेवा ३० जुन  शुक्रवार रोजी बंद ठेवली आहे. बुधवार २८ जुन  रोजी दिवसभर ते डबेवाले काम करतील व रात्री वहानाने पंढरपुरला रवाना होतील २९ जुन  गुरूवार रोजी एकादशीला शासकीय सुट्टी आहे त्या दिवशी डबेवाले पांडूरंगाचे दर्शन घेतील व ३० जुन शुक्रवार रोजी द्वादशीचा उपवास पंढरपुरात सोडतील व ते मुंबईला रवाना होतील १ जुलै  शनिवार रोजी डबेवाले नेहमी प्रमाणे कामावर हजर होतील.डबेवाल्यांची शेकडो वर्षाची वारीची परंपरा आहे. दरवर्षी तो सुट्टी घेऊन पंढरपुरला पांडूरंगाच्या दर्शनाला जातो यामुळे काही ग्राहकांची गैरसोय होणार आहे. त्याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो.

  पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू केल्या बद्दल आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभारी आहोत.या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे.मुंबई डबेवाला असोशिएशन संस्थेचे अध्यक्ष सुभाष तळेकर हे वेळी याबाबत बोलत होते.  

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८