त्याच्या खराब प्रदर्शनामुळे त्याला संघाबाहेर करण्याचीही मागणी केली जात होती. या कठीण प्रसंगात महेंद्रसिंह धोनीने विराटला आधार दिला. त्याला मदत केली. विराटला संघाबाहेर करण्याऐवजी संघाच्या फलंदाजीच्या क्रमात काही बदल केले. विराटला डिमोट केले.त्याचा असा परिणाम झाला की कोहलीने पुन्हा दमदार पुनरागमन केले.
वेस्टइंडिजचा माजी विकेटकीपर दिनेश रामदीन याने एका मुलाखतीत सांगितले होते, की धोनीने ऐनवेळी कोहलीला मदत केल्याने तो कठीण परिस्थितीतून बाहेर आला. ही गोष्ट 2014 ची आहे. इंग्लँड दौऱ्यात कोहली पूर्ण अपयशी ठरला होता. दहा इनिंग्जमध्ये त्याचा अॅव्हरेज १३.५ होता. विराटने स्वतःच हा दौरा त्याच्या करिअरमधील सर्वाधिक खराब काळ होता असा खुलासा केला होता. रामदीन पुढे म्हणाला, त्यानंतर वेस्टइंडिजचा संघ तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आला होता. कोहलीची काय कमजोरी आहे हे आम्हाला माहिती झाले होते. त्यामुळे पहिल्या सामन्यात कोहलीला फक्त दोन रनांवरच बाद करण्यात आम्हाला यश मिळाले.यानंतर कोहलीला संघातून काढून टाकण्याची मागणी जोर धरू लागली. त्यावेळी धोनी संघाच कॅप्टन होता. धोनीने विराटला संघाबाहेर केले नाही. तर नवा प्रयोग करत कोहलीला आणखी खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सांगितले. त्यामुळे कोहली 3 नंबर ऐवजी 4 नंबरवर फलंदाजीसाठी आला. या प्रयोगाचा त्याला फायदा मिळाला.त्याने 62 रन केले.मालिकेतील शेवटच्या सामन्यात धोनीने कोहलीला पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास पाठविले. त्यानंतर कोहलीने शतक ठोकले.धोनीमुळेच विराटला त्याच्या खराब फॉर्ममधून बाहेर पडण्यास मदत झाली.