तुकाराम मुंढे यांची कृषी विभागाच्या सचिव पदी बदली

मुंबई प्रतिनिधीसचिव (AD) कृषी आणि ADF विभाग मंत्रालय मुंबई म्हणून नियुक्ती महाराष्ट्रातील डॅशिंग सरकारी अधिकारी म्हणून लोकप्रिय असलेले IAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. तुकराम मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी आहेत. ते कडक शिस्तीचे आहेत. त्यांनी नवी मुंबई महापालिका तसेच नागपूर महापालिकेचं आयुक्त म्हणून कामकाज पाहिलं आहे. पण तुकाराम मुंढे हे त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे अनेक लोकप्रतिनिधींच्या मनाच्या ब्लॅकलिस्टमध्ये त्यांचं नाव कोरलं गेल्याची असल्याची दबक्या आवाजात सातत्याने चर्चा होत असते. मुंढे यांची गेल्या 17 वर्षात 20 पेक्षा जास्त वेळा बदल्या झाल्या आहेत. आतादेखील अवघ्या दीड महिन्यात त्यांची बदली झाली आहे.

  तुकाराम मुंढे यांची आता कृषी आणि ADF विभागात बदली करण्यात आली आहे. ते सध्या मंत्रालयात मराठी भाषा विभागात कार्यरत होते. पण आता त्यांची कृषी आणि एडीएफ विभागात बदली करण्यात आली आहे. मुंढे याआधी मराठी विभागाचे सचिव होते. पण आता बदलीनंतर ते कृषी आणि एडीएफ विभागाचे सचिव असणार आहेत.

तुकाराम मुंढे यांना मध्यंतरी अनेक महिने नियुक्ती नाही

  तुकाराम मुंढे यांची दीड महिन्यापूर्वीच बदली करण्यात आली होती. गेल्या महिन्यात मुंढे यांची मराठी भाषा विभागात बदली करण्यात आली होती. विशेष म्हणजे तेव्हा देखील त्यांची महिन्याभरात बदली करण्यात आली होती. तुकाराम मुंढे हे जून महिन्याआधी कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. 

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८