राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन योजनेच्या लाभार्थींना आवाहन

मुंबई प्रतिनिधी : राज्यातील राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या काही जुन्या लाभार्थींची परिपूर्ण माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे.त्यासाठी लाभार्थींनी आपले आधार कार्ड भ्रमणध्वनी क्रमांक हयातीचा दाखला व मानधन जमा होत असलेल्या बँक खात्याच्या पासबुकच्या छायांकित प्रती तालुक्याच्या ठिकाणी गटविकास अधिकारी पंचायत समिती या ठिकाणी जाऊन जमा कराव्यात, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

  मुंबई शहर व मुंबई उपनगरमधील लाभार्थींनी आपली माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालय जुने सचिवालय पहिला मजला विस्तार भवन मुंबई -32 या ठिकाणी द्यावी किंवा dcamandhan@gmail.com या ईमेलवर पाठवावी असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८