औरंगाबाद प्रतिनिधी (विमाका) : विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्ष निवडीची बैठक आज पार पडली. या बैठकीत साम टि. व्ही.चे डॉ. माधव गुणवंतराव सावरगावे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.विभागीय संचालक (माहिती) कार्यालयात आयोजित बैठकीत ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली त्यात समितीचे सदस्य चक्रधर दळवी अनिल महाजन डॉ. माधव सावरगावे विनोद काकडे अरुण सुरडकर यांनी सहभाग घेतला.
डॉ.माधव सावरगावे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. औरंगाबाद विभागाचे संचालक (माहिती) किशोर गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून औरंगाबादचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी काम पाहिले. यावेळी समिती सदस्यांसह माहिती अधिकारी डॉ मीरा ढास, सहायक संचालक गणेश फुंदे उपस्थित होते.
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८