केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी घेतले श्री साई समाधीचे दर्शन

शिर्डी प्रतिनिधी : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दर्शन घेतले. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन ही घेतले. 

  केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मंदिरात आगमन झाल्यावर मुख्यमंत्री शिंदे महसूल पशुसंवर्धन दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर  साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.सिवाशंकर पोलीस अधीक्षक राकेश ओला उपस्थित होते.

  केंद्रीय संरक्षण मंत्री सिंह यांचे श्रीसाईबाबा मंदिरात आगमन झाल्यावर त्यांनी श्रीसाईबाबा समाधीचे दर्शन घेत पाद्यपूजा व आरती केली.  साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी पी.सिवाशंकर यांनी संरक्षण मंत्री सिंह व मुख्यमंत्री शिंदे यांचा श्रीसाईबाबा यांची मूर्ती भेट देत सन्मान केला.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८