मुंबई प्रतिनिधी चित्रलेखा : दिवाळीमध्ये (Diwali २०२३)लोकांचा सोनं खरेदीकडे (Gold Buying)अधिक कल असतो.या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्री (gold)होते. सोन्याचे भावही गगनाला चांगलेच तेजीत असतात. सध्या ६१ हजार रुपयांच्यावर पोहोचला आहे. सोनं हे महाग असल्यामुळे ते घेताना आपल्याला त्याच्याबद्दल काही बेसिक माहिती असलीच पाहिजे.नाहीतर आपली फसवणूक (Froad)होण्याची दाट शक्यता आहे.सोनं खरं की खोटं? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही माहिती फायद्याची ठरु शकते.
दिवाळीत सोने खरेदीसाठी लोक सर्वतोपरी प्रयत्न करतात.कारण दिवाळ्याच्या काळात सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याचा HUID नंबर तपासायला विसरू नका. 1 एप्रिलपासून सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार कोणत्याही ज्वेलर्सला हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) शिवाय सोने विकता येणार नाही. हा HUID नंबर कसा काम करतो ? त्याचे फायदे काय आहेत आणि HUID च्या बाबतीत काय लक्षात ठेवले पाहिजे? याची माहिती जाणून घेऊया.

