जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले याचा आनंद ; मात्र योग्य निर्णय होऊ शकला नाही याची खंत...
कन्नड प्रतिनिधी : जरांगे पाटील यांचे अंतराळी गावातील दुसरा टप्प्यातील आंदोलन मागे घेतले याच्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करीत असताना माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सरकार आणि जरांगे पाटील यांनी यातून योग्य असां मार्ग न काढता उलट ओबीसीचा राग ओढूवून घेतला आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सरकारच्या वतीने वारंवार सांगण्यात येत होते की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देऊ तसे मात्र आजच्या निर्णयाने होताना दिसत नाही आजच्या निर्णयामुळे येणाऱ्या काळात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष राज्यात होण्याची भीती राठोड यांनी व्यक्त केली.
ओबीसीतील सर्व जाती समूहाला तसेच मराठा कुणबी आणि लेवा पाटील आणि बारा बलुतेदार (विश्वकर्मीय) वेगळा आरक्षणाची मागणी करित आहे त्यांना वेगळे आरक्षण देण्याकरिता ओबीसी आरक्षणाचे सबकाटेरायझेशन (विभाजन) करावे जेणेकरून सर्वांना सामाजिक न्याय मिळेल अशी विनंती आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी शासनाला केली आहे.