वसई-विरार महानगरपालिकेत पाणी पुरवठा योजना लागू करावी -अंबादास दानवे विरोधी पक्षनेते

शिवसेना पालर जिल्हाप्रमुख पंकज देशमुख व काकासाहेब मोटे यांच्या पाठपुव्याला यश मिळाले ?

नागपूर प्रतिनिधी : वसई-विरार महानगरपालिका ०३ जुलै  २००९ साली स्थापन झाली होती तेव्हा पासून महानगरपालिकेच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता तेथे पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात यावी. शहर आणि ६९ गावांना प्रथम प्राधान्याने पाणी मिळावे यासाठी तातडीने योजना लागू करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात केली.तसेच योग्य पाणी मिळावे यासाठी ६९ गावांना अतंर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात यावी.

  वसई- विरार महानगरपालिकेची स्थापन झाल्यापासून हा प्रश्न ऐरणीवर होता.यावेळी समाविष्ट करण्यात आलेली ६९ गावांना पाणीपुरवठा नसल्याने या गावातील हजारो रहिवाशांना खुप मोठा मनस्तापस होत होता आणि नाविलाजास्त  क्षारयुक्त पाणी प्यावे लागत होते यामुळे अनेक नागरिकांना दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत असल्याची माहिती दानवे यांनी सभागृहात देत वसई विरार महानगरपालिकेतील पाण्याचा प्रश्न सभागृहात लावून धरला.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८