रूतुजा देगलूरकर हिने कराटे स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले..


वी मुंबई प्रतिनिधी : नुकत्याच नवी मुंबई येथे झालेल्या उलवे येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे (२९ सप्टेंबर ) अखिल भारतीय खुली कराटे अजिंक्य स्पर्धेत सब ज्युनिअर या गटातून कुमारी ऋतुजा वसंत देगलूरकर हिने सुवर्णपदक पटकावले असून ही ११ वर्षाखालील गटात खेळली आहे. त्यानंतर अनुप अनुकल्प संतोष यादव याने ११ वर्षाखालील गटात कास्यपदक तर लकी नायडू याने रौप्य पदक १० वर्षाखालील गटात पटकावले आहेत.

   सर्व विद्यार्थी कल्याण येथील नारायणा टेक्नो स्कूलमध्ये शिकत असून यांचे प्रशिक्षक विवेक शुक्ला यांनी अतिशय मेहनतीने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आई-वडील यांच्या मेहनतीनंतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी प्रेरित करून प्रोत्साहन दिले त्यानंतरच हे तीनही विद्यार्थी इथपर्यंत पोहोचले आहेत.

   या स्पर्धेदरम्यान तीनही विद्यार्थ्यांचे पालक आणि प्रशिक्षक उपस्थित होते.या वयात पालकांनी जर आपल्या पाल्यास खेळण्यासाठी प्रवृत्त करून योग्य ते मार्गदर्शन करून योग्य त्या प्रशिक्षकाची नेमणूक करून प्रशिक्षण दिले तर भविष्यात राज्यासह देशाचं नाव अवलंबिक करण्यासाठी खऱ्या अर्थाने मदत होईल.

माझ्या ऋतूज्याने माझ्याकडे कराटे खेळण्यासाठी हट्ट धरला असून मी तिचा कराटे स्पर्धेचा हट्ट पुरविला आहेत.माझ्यासारखे इतरही पालकांनी आपल्या पाल्याचे हट्ट पुरवावे मोबाईलवर वारंवार गेम खेळवण्यांपेक्षा मैदानावर खेळले जाणारे खेळ कधीही शरीरासाठी आणि आरोग्यासाठी चांगलेच आहेत -वसंत देगलूरकर ऋतुजाचे वडील

 मी माझ्या विद्यार्थ्यांना यापेक्षाही मोठमोठ्या स्पर्धेत खेळवण्यासाठी तयार करीत आहेत फक्त पालकांनी मला सहकार्य -विवेक शुक्ला प्रशिक्षकसप्तरंग   कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८