श्रीधर बुधाजी देवलकर जे आपली शासकीय सेवा सांभाळून गेली तीस वर्षे रक्तदान सहाय्य केंद्र या संस्थे द्वारे रक्तदान शबिरांचे आयोजित करून शासकीय नियमानुसार रुग्णांना विनामूल्य रक्तकुपिंचा पुरवठा करीत आहे.या तीस वर्षात आपली शासकीय सेवा सांभाळून त्यांनी १२५ रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत.जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिरांचे शतकपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता.या पवित्र सोहळ्यास आवर्जून उपस्थित असलेले राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्याचेसहाय्यक संचालक डॉ.संजय जाधव यांनी दीप प्रज्वलीत करून सोहळ्याचे उद्घाटन केले तसेच त्यांच्या शुभ हस्ते स्वेच्छा रक्तदाते आणि मान्यवरांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी देवलकर परिवाराचे त्यांनी तोंडभरून कौतक करताना रक्तदानाचे महत्व या विषयावर मौलिक विचार मांडून रक्तदाते व समाजसेवक यांचा उत्साह वाढविला.प्रथमच रक्तदान कार्यक्रमात संगीताचा नजराणा पेश करून रक्तदाते यांचा सन्मान करताना देवलकर यांनी आपल्या काव्य स्वरूपात सन्मानपत्र बहाल केले.रक्तदान शिबिरांचा शतकपूर्ती सोहळा बोरिवली पूर्व येथील सहकार भवन सभागृह स्व.मोहन वाघ फुलपाखरू उद्यान या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.या पवित्र सोहळ्यास सुनील जाधव लक्ष्मण शेडगे सत्यवान राणे रमेश मोरे यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच सभागृहाचे प्रमुख आणि रक्तदाते भरत घाणेकर आणि समाजसेवक कृणाल अशोक भट यांचे ही या पवित्र सोहळ्यास योगदान लाभले.या पवित्र सोहळ्यास रक्तदानाचे शतकवीर सुरेश रेवणकर पार्धे आणि विजय पांचाळ रवीभाई हिरवे पत्रकार रक्तदाते पाईकराव यांची उपस्थिती लक्षणीय होती.देवलकर यांनी सर्व रक्तदाते आणि उपस्थितांचे आभार मानले.