माहिती अधिकार कायदा अधिक सक्षम करण्यात यावा यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट..-दिगंबर वाघ दैनिक माझा मराठवाडा

पुणे प्रतिनिधी : राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक व पद्मभूषण पुरस्कारप्राप्त अण्णा हजारे यांची भेट दैनिक माझा मराठवाडा विधीतज्ञ तथा पत्रकार दिगंबर वाघ यांच्यासह यशोदा प्रशिक्षण सोशल फाउंडेशन संचलित यशोदा माहिती अधिकार प्रशिक्षण संस्था पुणे या संस्थाचे संस्थापक अध्यक्ष खंडूअण्णा गव्हाणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. धर्मदाय आयुक्त यांच्या नियम व अटी उद्दिष्टप्रमाणे १ ऑगस्ट २०२५ रोजी यशोदाचा कार्यकारणीची बैठक संपन्न झाली.या मासिक मीटिंगमध्ये ठरलेल्यानुसार नियमाप्रमाणे संस्थेने कार्यकारणी तयार केली असून अध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांना समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र व ओळखपत्र देऊन यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अण्णांचे स्वागत दिगंबर वाघ संस्थेचे अध्यक्ष खंडूअण्णा गव्हाणे यांच्यासोबत इतर पदाधिकाऱ्यांनी अण्णांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच अण्णांनी कौतुक करून चांगले काम करण्यासाठी माझा आपल्याला आशीर्वाद आहे अशी पाठीवर शाब्बासकीची थाप दिली.

    शासकीय कार्यालयाकडून कलम-४ च्या १ ते १७ बाबीं आजही अद्यावत करण्यात आलेल्या नाही हा कायदा अस्तित्वात येऊन २० वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला तसेच सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा शासकीय यंत्रणा या बाबी अद्यावत करत नाहीत.ही बाब अतिशय गंभीर असून याची तक्रार पत्रकार दिगंबर वाघ यांनी अण्णांकडे यावेळी केली. त्यावर अण्णांनी मी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून त्यावर तोडगा काढतो असे आश्वासन दिले आहेत.

  यावेळी संस्थेची कार्यकारिणी सभासद कार्यकर्ते उपस्थित होते.अनेक संवेदनशील प्रश्नांवर उपाय अण्णांनी आपल्या मनोगतातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांमध्ये काम करण्यास उत्साह वाढवला.डॉ.वामन साळवे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित सादर केले होते. यशोदा संस्थेची उद्दिष्ट प्रामाणिक कामकाज दर्जेदार प्रशिक्षण कार्यकारणी व घडलेले विद्यार्थी तसेच माहिती अधिकार अधिनियम-२००५ तथा लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ या कायद्याचे दर्जेदार प्रशिक्षणा देऊन अनेक नागरिकांना सक्षम करण्याच्या हेतूने संस्थेची स्थापना झाली आहेत.चुकीच्या पद्धतीने काम करून संस्थेच्या कार्यकर्त्यांना कोठेही गालबोट लागणार नाहीत तसेच कायद्यातील वेळोवेळी झालेले बदल किंवा दुरुस्त्या यावर संस्था लक्ष ठेवून असेल असे आश्वासन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष खंडूअण्णा गव्हाणे यांनी अण्णां समोर दिले.

 संस्थेचा उद्देश सर्वसामान्यांपर्यंत सर्वसामान्यांच्या हिताचे कायदे पोहोचवणे हाच असून या कार्यक्रमात यशोदा संस्थेचे प्रशिक्षक मार्गदर्शक डॉ.वामन साळवे ज्येष्ठ पत्रकार दिगंबर वाघ अध्यक्ष राहुल वाळंज खजिनदार चिंतामण ढमढेरे प्रचार प्रमुख राकेश दळवी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड उपाध्यक्ष सतीश चव्हाण सरोज नागरगोजे संस्थाच्या उपाध्यक्ष विद्याताई गव्हाणे सहनियोजक अक्षय शेळीमकर शिरूर तालुका अध्यक्ष संतोष गव्हाणे गौरव गव्हाणे संस्था सचिव आदित्य गव्हाणे मावळ तालुकाध्यक्ष रामचंद्र इंगवले कार्यकर्ते सचिन तोत्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८