_ मुंबई - मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणा-या जिल्हा परिषदांच्य अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे. राज्यातील ३४ जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका ह्या पुढील वर्षाच्या सुरुवातीला होत आहेत. कोणत्या जिल्ह्याला कोणतं आरक्षण? - अनुसूचित जाती - भंडारा, अमरावती. अनुसूचित जाती महिला राखीव - हिंगोली, नागपूर. अनुसूचित जमाती महिला - नंदुरबार, ठाणे, गोंदिया. अनुसूचित जमाती - वर्धा, पालघर. नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) - अकोला, उस्मानाबाद, धुळे, पुणे. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ओबीसी) - जळगांव, बुलढाणा, औरंगाबाद, परभणी, यवतमाळ. सर्वसाधारण प्रवर्ग महिला - सातारा, रत्नागिरी, नाशिक, रायगड, अहमदनगर, सोलापूर, लातूर, वाशिम. सर्वसाधारण प्रवर्ग - जालना, नांदेड, चंद्रपुर, गडचिरोली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड, सांगली. यापैकी धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम यांची आरक्षणे या जूनपासून लागू होतील. पालघरचे जुलै २०१७ पासून, तर भंडारा, गोंदियाचे डिसेंबर २०१७ पासून लागू होणार आहे. इतर जिल्ह्यांचे २०१७ मार्च निवडणूक झाल्यानंतर होईल.
राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठीआरक्षण जाहीर