ठाणे शहरात कोरोना योध्दा यांना कोणतीही सुरक्षा उपकरणे देण्यात येत नाही.
ठा.म.पा. कोणतेही सुरक्षा (पी.पी.ई.किट) न पुरवता केली कोरोना योद्धाची नेमणूक
ठाणे प्रतिनिधी मिलिंद महाडीक
ठाणे महानगरपालिकेच्या लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समितीच्या सहा.आयुक्तांनी सहीनीशी नेमलेल्या कोविड योध्द्यांना “आरोग्य सुरक्षा (Mediclaim) व जीवन विमा सुरक्षा कवच” देण्याची मागणी ठाणे मनसे प्रभाग क्र.१४ ने ठामपा आयुक्ताने केली आहे.ठाणे शहरातील कोरोना रोगाचा प्रादुर्भाव हा मोठ्याप्रमाणत वाढत आहे,या रोगाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी ठामपा आयुक्त विजय सिंघल खुप चांगल्या उपाययोजना अवलंबत आहेत. या उपाययोजना आधिक प्रभावी होण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांच्या सोबतीला “कोविड योध्द्यांची” नेमणूक सुध्दा केली आहे.समाजातील बरेचसे स्वयंमसेवी नागरिक यासाठी पुढे देखिल आले.परंतु राज्य शासनाच्या परिपञकानुसार “५५ वर्षावरील” कर्मचाऱ्यांनी आरोग्य सुरक्षेच्या कारणास्तव घरी राहाण्याचे आदेश देण्यात आले व जे कर्मचारी अशा परीस्थितीत आपले कर्तव्य बजावत आहेत त्यांना “योध्द्याची” उपाधी देऊन, आशा कर्मचाऱ्यांना “आरोग्य सुरक्षा व जीवन विमा सुरक्षा कवच” देण्यात आले. कोरोना रोगाचा वाढता प्रार्दुभाव पाहता घरोघरी जाऊन सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश आपण दिले आहेत.परंतु आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कमतरते अभावी,त्यांच्या सोबत पॅरामेडिकल स्टाफ म्हणून “कोविड योध्द्यांची” नेमणूक प्रभाग समितीच्या सहा.आयुक्तांच्या सहीनीशी करण्यात आली.परंतु या यादीमधे ५० ते ५८ वर्षावरील स्वयंमसेवकांची देखिल नेमणुक केलेली आहे. परंतु शासन आदेशानुसार जर ”५५ वर्षावरील” कर्मचाऱ्यांना आरोग्य सुरक्षेच्या कारणांसाठी घरी बसण्यास सांगितले आहे, तरीही लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समितीच्या सहा.आयुक्तांनी आपल्या सहीनीशी कोविड योध्द्यांची घरोघरी जाऊन नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आरोग्य केन्द्राच्या कर्मचाऱ्यांसोबत “पॅरामेडिकल स्टाफ” म्हणून नेमणूक करताना,अशा कोविड योध्द्यांच्या वयाकडे दुर्लक्ष केले आहे.तसेच हे योध्दे घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करताना यांच्या सुरक्षेसाठी कोणतेही सुरक्षा कवच ( पीपीई किट) परिधान केलेले नसते, अशावेळी एखाद्या कोविड रुग्णाच्या संर्पकात हे स्वयंमसेवक आल्यास,त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो व अशावेळी त्यांच्या आरोग्याची व आयुष्याची काळजी करणे हे आयुक्त म्हणून सर्वस्वी आपल्याच हातात आहे.त्यामुळे या पञाद्वारे आमची आपल्याकडे अशी मागणी आहे,की आपण अशा योध्दयांना “आरोग्य सुरक्षा (मेडिक्लेम) व जीवन वीमा सुरक्षा कवच” द्यावे.कर्तव्य बजावताना अघटीत घडाल्यास त्यांच्या वारसांना ठामपा प्रशासनाने आपल्या सेवेत नोकरी द्यावी. कळावे.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८
घरी राहा, सुरक्षित राहा
प्रशासनाला सहकार्य करा...