बंधपत्रित आरोग्य सेविकांना तातडीने सेवेत समाविष्ट करुन घेण्याचे

बंधपत्रित आरोग्य सेविकांना तातडीने सेवेत समाविष्ट करुन घेण्याचे


विधानसभा अध्यक्ष नाना पटोले 


 



मुंबई प्रतिनिधी : राज्यातील जिल्हा परिषदा अंतर्गत बंधपत्रित आरोग्य सेविकांची सेवा नियमित करण्याबाबत‍ ग्रामविकास विभागाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून तातडीने कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिले. 


            विधानभवन मुंबई येथे या संदर्भात आज दिनांक ३० जून २०२०  रोजी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा संघटनेच्या निवेदनावर बैठक आयोजित करण्यात आली.  या बैठकीस राष्ट्रीय आरोग्य अभियानचे आयुक्त अनुपकुमार यादव, वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, ग्रामविकास विभागाचे उपसचिव पंडीत जाधव आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.  


            सेवेची आवश्यकता लक्षात घेवून आरोग्य सेविकांना शासनाने सन २००६ नंतर प्रशिक्षण दिले आणि बंधपत्रित कालावधीकरीता त्यांची सेवा सुरु केली.  त्यांच्या सेवेसंदर्भात सेवापुस्तिकाही तयार करण्यात आल्या.  सेवापुस्तिका तयार झाल्याने सेवेत सामावून घेतले जाईल या आशेने त्यांनी काम सुरु ठेवले. सर्वांनी शासकीय सेवेस पात्र असलेली वयोमर्यादाही ओलांडली आहे.


      दिगंबर वाघ


        कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏