महाराष्ट्र नवनिर्माण सेना बोरिवली यांच्याकडून थर्मल स्क्रिनिंग चेकिंग कॅम्प

महाराष्ट्र नवनिर्माण सेना बोरिवली यांच्याकडून थर्मल स्क्रिनिंग चेकिंग कॅम्प


महाराष्ट्र नवनिर्माण सेना बोरिवली विधानसभा प्रभाग क्र. ९ आयोजित कोविड 19
थर्मल स्क्रिनिंग चेकिंग कॅम्प (ताप, ऑक्सिजन, नाडीचे ठोके तपासणी)
बोरिवली प्रतिनिधी अनुराग पवार


        पुष्कर आयुर्वेदीक हेल्थ सेंटर संचालक डाॅक्टर मंगेश खाडे यांच्यामार्फत स्थानिक रहिवाशांकरिता शरीराचे तापमान(थर्मल चेकिंग), ऑक्सिजन पातळी तसेच नाडीठोके तपासणी व विनामूल्य आयुर्वेदिक रोगप्रतिकारक औषध उपलब्ध करून देण्यात आली.    
      मनसे सरचिटणीस नयनजी कदम व बोरिवली विभाग अध्यक्ष प्रसाद कुलापकर यांचे मार्गदर्शना खाली महाराष्ट्र  नवनिर्माण सेना बोरिवली विधानसभा शाखा क्रमांक ९ च्या वतीने प्रभागात कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन लाॅकडाऊनच्या स्थितीत कोविड योद्धांना सहकार्य म्हणून गेले सहा दिवस जुनी एम एच बी वसाहत, गोराई मध्ये उपक्रम राबविण्यात आला. 
      डाॅक्टर्स व त्यांच्या सहकाऱ्यांकरिता मनसे महिला सरचिटणीस रिटाताई गुप्ता यांनी PPE KIT उपलब्ध करून दिले. सदर शिबिरास मनसे सरचिटणीस नयनजी कदम, विभाग अध्यक्ष प्रसाद कुलापकर, उपविभाग अध्यक्ष  कुणाल माईणकर यांनी भेट दिली. तसेच महिला उपविभाग अध्यक्षा अपेक्षा पवार, म. शाखा अध्यक्षा सुरेखा ठोके, आरोग्यसेविका असणाऱ्या माजी महिला शाखा अध्यक्षा ॠतुजा राणे उपशाखा अध्यक्ष सागर दळवी, यांच्या सह महाराष्ट्र सैनिक नंदकिशोर तोडणकर, सचिन गमरे आणि अनुराग पवार (NUJM सदस्य) उपस्थित होते. 
     स्थानिक शाखा अध्यक्ष महेश नर यांनी राबविलेल्या या उपक्रमाचा राहिवाश्यांनी लाभ घेतला.


      दिगंबर वाघ


                कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


               घरी राहा, सुरक्षित राहा 
               प्रशासनाला सहकार्य करा...