महिला व बालविकास विभागाकडून २५ हजार व्यक्तींचे समुपदेशन

महिला व बालविकास विभागाकडून २५ हजार व्यक्तींचे समुपदेशन


महिला व बालविकास विभागाकडून लॉकडाऊनच्या काळात मानसिक आधार


हेल्पलाईनच्या माध्यमातून तब्बल २५ हजार व्यक्तींचे समुपदेशन घरगुती हिंसाचाराच्या ४ हजार प्रकरणात मदत



मुंबई प्रतिनिधी : कोविड-१९ परिस्थितीमुळे लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अडकून पडलेले राज्यातील तसेच परराज्यातील मजूर, कामगार तसेच स्थलांतरितांना आर्थिक, मानसिक समस्या तसेच ताण-तणावावर मात करण्यासाठी राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत महिला व मुलांकरिता विशेष सहाय्य कक्षामार्फत मदत तसेच समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याअंतर्गत २५ हजार १६३ व्यक्तींना समुपदेशन, मार्गदर्शन किंवा माहिती पुरविण्यात आली असून घरगुती हिंसाचाराच्या अनुषंगाने समुपदेशकांना प्रत्यक्ष तसेच हेल्पलाईनवर प्राप्त ४ हजार ६५ दूरध्वनी संदेशांच्या प्रकरणात मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उल्लेखनीय कामाची प्रशंसा महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली आहे.


            करोना विषाणूमुळे मनात असलेली भीती,अस्वस्थता , कुटुंबाची काळजी, भविष्यातील अंधार, कुटुंबापासून लांब राहावे लागणार याची जाणीव, मानसिक ताण-तणाव या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी समुपदेशनाची सेवा शासनाने उपलब्ध करून दिली. महिला व बाल विकास आयुक्तालयाने राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनास आयुक्तालयांतर्गत कार्यरत सर्व १२३ समुपदेशन केंद्रांची यादी, कार्यरत असलेल्या सर्व सोशल वर्कर्सच्या नाव आणि संपर्क क्रमांकासहित यादी उपलब्ध करून दिली. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी याबाबतचे नियोजन केले आणि त्याप्रमाणे काम केले. हे  कक्ष तथा समुपदेशन केंद्रे पोलीस ठाण्यांच्या आवारात आहेत.


        जिल्हा आणि तालुका स्तरावर जिल्हा प्रशासनाने व्यवस्था केलेल्या निवासी शिबिरातून राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेले मजूर, कामगार आणि त्यांचे कुटुंबीय तर होतेच पण पर राज्यातील परत निघालेले मजूर मोठ्या प्रमाणात प्रत्येक शिबिराच्या ठिकाणी आढळून आले. शिबिरात राहत असलेल्या सर्व स्त्री, पुरुष स्थलांतरित मजुरांना समुपदेशकांनी कोरोना विषाणूबाबतची माहिती तसेच घ्यायची काळजी, स्वच्छतेचे महत्व, योग्य सुरक्षित अंतर, मास्कचा नियमित वापर, सॅनिटायझरचा वापर आदी माहिती सोप्या भाषेत समजावून सांगितली. 


समुपदेशनाद्वारे मानसिक, भावनिक आधार


        करोना विषाणूबाबत शिबिरात राहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात भीती,अस्वस्थता होती तसेच कुटुंबाची, भविष्याची चिंता होती. या सर्व मानसिक ताण  तणावावर  समुपदेशकांनी अतिशय कौशल्यपूर्ण काम करत समुपदेशनाच्या माध्यमातून भावनिक, मानसिक आधार दिला आणि त्यांचे मनोधैर्य वाढविले. वैयक्तिक मजुरांच्या  समस्यांवर काम केले. आर्थिक अस्थिरतेमुळे अनेकांच्या मनात आत्महत्येचे विचार  येत होते समुपदेशकांनी त्याना सकारात्मक विचार करायला शिकविले. काही ठिकाणी काहीही करून घरी परतण्याच्या तीव्र इच्छेने शिबिरातून मजूर पळून जात होते. त्याकरिता त्यांनी सहनशीलता दाखवावी आणि स्थानिक प्रशासनाला मदत करावी यासाठी त्यांच्याशी सातत्याने बोलून मदत करत होते. हे सगळे काम समुपदेशकांनी समुपदेशनाच्या विविध तंत्रांचा आणि अनुभवाचा वापर करून  केले. 


मजुरांसोबत घेतले विविध उपक्रम - गटचर्चा


       समुपदेशकांनी, सोशल वर्कर्सनी मजुरांच्या रहाण्याची, जेवणाची नीट व्यवस्था आहे ना याबाबत स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली लक्ष पुरविले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून कोविड १९, व्यक्तिगत स्वच्छता, ताणतणावांचे नियमन याबाबत सत्रे घेतली. मजुरांच्या शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी योगासने, खेळ यांचासुद्धा वापर करण्यात आला.  


विविध शासकीय यंत्रणा, खासगी,  सामाजिक संस्था  यांच्यासोबत समन्वय


      दिगंबर वाघ


               कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


 


                        घरी राहा, सुरक्षित राहा 
                        प्रशासनाला सहकार्य करा...