जॉय संस्था व साईभक्त श्रीकांत रेडकर यांची गरजूंना मदत

जॉय संस्था व साईभक्त श्रीकांत रेडकर यांची गरजूंना मदत...जोगेश्वरी प्रतिनिधी अनुराग पवार    


         जोगेश्वरी पूर्व येथील निस्सीम साईभक्त श्रीकांत रेडकर व जॉय संस्था यांच्या संयुक्त विधमाने नुकतेच जोगेश्वरी पूर्व येथील गरीब व गरजू कुटुंबाना जीवनावश्यक किराणा सामान (तांदूळ,डाळ,गोडेतेल,साखर,रवा,पोहे,मीठ,कोलगेट या वस्तु) वाटप करण्यात आले.सध्या लॉकडाउन सुरू असून अनेक कुटुंबांचे मासिक उत्पन्न अत्यन्त तुटपुंजे असल्यामुळे अशा लोकांना दैनंदिन गुजराण करण्यास आटापिटा करावा लागत आहे व अशा या कुटुंबांची ही अन्नधान्याची गरज लक्षात घेऊन जोगेश्वरी येथील रेडकर परिवार व जॉयने या लोकांना क्षणाचाही विचार न करता मदत देण्यासाठी पाऊल उचलल्याचे जॉयचे संस्थापक गणेश हिरवे यांनी सांगितले.लॉक डाउन काळात सर्वजण घरीच असल्याने व हा वेळ वाया न घालवता तो वाचन संस्कृती जोपासता यावी व वाचनाची आवड वृद्धिंगत व्हावी यासाठी सर्व लाभार्थीना लोकप्रिय हसती दुनिया हे मराठी मासिकही भेट देण्यात आले.याधीदेखील आमच्या परिवाराने विविध संकटांच्या वेळी अनेकांना सहकार्य केलेले आहे व हे सर्व साईबाबांच्या आशिर्वादामुळे होत असून आम्ही केवळ निमित्तमात्र आहोत अशी भावना यावेळी श्रीकांत यांच्या मातोश्री शालिनीताई रेडकर यांनी व्यक्त केली.यावेळी सामान वितरण करण्यासाठी समाजिक कार्यकर्ते राजेंद्र मयेकर हेदेखील जातीने उपस्थित होते.


     दिगंबर वाघ


               कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


                 घरी राहा, सुरक्षित राहा 
                 प्रशासनाला सहकार्य करा...