युवा संस्था आणि रिलीफ टिम यांच्या संयुक्त विद्यमाने किट वाटप.
युवा संस्था मुंबई आणि रिलीफ टिम उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महिन्याभराचे किट वाटप.
कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण
लाँकडाऊन च्या काळात उपासमारीची वेळ येऊ नये म्हणुन युवा संस्था मुंबई आणि उल्हासनगर रिलीफ टिम यांच्या माध्यमातुन कल्याण टिटवाला बदलापुर अंबरनाथ उल्हासनगर या ठिकाणी राहणाऱ्यां शेकडो गरजु लोकांना मदत करण्यात आली आहे.
कल्याणमध्ये पुन्हा लाॅकडाऊन चालू झाल्यामुळे हातावर पोट असलेले कामगार निराधार महिला व काही पत्रकार यांना एक महिन्याचे राशन देण्यात आली. त्यामुळे अशोक नगर वाॅलधूनी येथील गरजूंनी समाधान व्यक्त केले. युवा संस्था चे बाल अधिकार कार्यकर्ता आणि उल्हासनगर रिलीफ टिमचे समन्वयक प्रकाश भवरे ज्येष्ठ समाजसेविका शोभाताई जाधव शंकर काकडे सिध्दार्थ सोनवणे अनिकेत वाघ अक्षय काकडे आकाश काकडे किरण गुप्ता ऋषिकेश सरदार संपाद्क कारभारी पवार सह संपादक संजय भोरङे पत्रकार प्रकाश पवार पत्रकार सनी भोरङे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८
घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏