वाढदिवसानिमित्त २५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त २५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण



मुंबई प्रतिनिधी :  कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांसह साजरा करण्याचे आवाहन केले आहे. याला प्रतिसाद देत परिवहनमंत्री अनिल परब आणि खासदार अरविंद सावंत यांनी आज मुंबईतील शिवसेनेच्या विभागांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. एकता मंच तसेच चैतन्य ओंकार ट्रस्ट यांच्या सहकार्याने १३ रुग्णवाहिकांचे तर जाणीव ट्रस्ट तर्फे १२ रुग्णवाहिकांचे लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. 


            राज्यासह मुंबईत झालेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिकांची लागणारी गरज ओळखत आज त्या उपलब्ध करून देण्यात आल्या. कोरोनासारख्या आजारात शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी होण्याची शक्यता असते त्यामुळेच या सर्व रुग्णवाहिका ऑक्सिजन सुविधेने सुसज्ज असून यात नवीन तंत्रज्ञानच्या स्ट्रेचरचा वापर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कौतुक करताना सांगितले की शिवसेनेच्या पिढ्यांप्रमाणेच रुग्णवाहिका देखील अद्ययावत झाल्या आहेत. रुग्णवाहिका आणि शिवसेना हे नाते जुने असल्याचे ते म्हणाले.


 दिगंबर वाघ  


       कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏