म्हणून वाजपेयींनी महाजनांना लक्ष्मणाचा किताब दिला

या माणसापासून रामजन्मभूमी आंदोलनाला सुरवात झाली..


म्हणून वाजपेयींनी महाजनांना लक्ष्मणाचा किताब दिला होता.


गोवा भाजपचे प्रभारी होते प्रमोद महाजन. ते पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील नेते होते. 


मनोहर पर्रीकर सांगतातमुंबई प्रतिनिधी : त्याकाळी आम्हाला कोणतेही काम पडले, महाजनांना काही सांगावेसे वाटले तर आम्ही गोपीनाथ मुंडे यांची मदत घ्यायचो. मुंडे आमच्यासाठी मार्गदर्शक होते. १९८९ सालच्या पालमपूर अधिवेशनात भाजपने विश्व हिंदू परिषदेच्या रामजन्मभूमी आंदोलनात उडी घ्यायचा निर्णय घेतला. प्रमोद महाजन यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या रामरथात स्वार होऊन लाकृष्ण अडवाणी यांनी अख्खा देश हलवून सोडला. रामजन्मभूमी आंदोलनामागे प्रमोद महाजन यांनी आपली सारी चाणक्यनिती पणाला लावली होती. अटलबिहारी वाजपेयी यांचा विरोध असूनही हे आंदोलन सुरु झाले. महाजन यांच्या नियोजनामुळे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या आंदोलनाशी जोडले जाऊ लागले. गोव्यात देखील रामजन्मभूमीचे आंदोलन पेटले. मनोहर पर्रीकर हे यादेखील आंदोलनात पुढे होते.
त्यांनी गोव्याच्या घराघरात जाऊन राममंदिरचे महत्व पटवून दिले. त्यांनी १९८९ साली गोव्यातून ८० जणांची पहिली कारसेवकांची बॅच अयोध्येला पाठवली. इतर राज्यांच्या तुलनेत आपण मागे पडत आहे असे वाटून पुढच्या वर्षी कारसेवा करायला जवळजवळ ३५० जण गोव्यातून निघाले.


यात मनोहर पर्रीकर व त्यांची आई राधाबाई देखील होती.


    हे कारसेवक अयोध्येला पोहचले तेव्हा रात्रीच्या वेळी रेल्वे स्टेशनवरच मुक्काम केला होता. साधारण मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता या झोपलेल्या कारसेवकांच्या जथ्थ्यावर लाठीहल्ला केला.कोणालाही काहीही सुचेना. अचानक धावपळ सुरु झाली, चेंगराचेंगरी झाली. अशातच पोलिसांनी क्रूरपणे लाठीचार्ज सुरूच ठेवला होता. अनेकांची डोकी फुटली,  मनोहर पर्रीकर यांनाही लाठ्या खाव्या लागल्या. पण त्यांना चिंता आपल्या वयस्कर आईची होती. गर्दीत ती हरवून गेली होती. सगळ शांत झाल्यावर मनोहर पर्रीकर यांनी आईना शोधून काढले. त्यांच्यावरही निर्दयी पोलीस शिपायांनी लाठी हल्ला केला होता. पण त्याला त्यांनी धैर्याने सामना केला होता. पुढे अयोध्येतून परत आल्यावर देखील अनेक दिवस वृद्ध राधाबाई आपल्या जखमेची खून सगळ्यांना दाखवायच्या व रामासाठी रक्त सांडल असल्याचं अभिमानाने सांगायच्या.


गोव्याच्या कारसेवकांचे बलिदान वाया गेले नाही.
       प्रमोद महाजन यांनी ओळखल की या तरुणांना प्रोत्साहन दिल तर गोव्यात राजकीय चमत्कार घडू शकतो. रामजन्मभूमीच्या आंदोलनात काम जीव तोडून करणाऱ्या, गोव्याच्या कानाकोपऱ्यात भाजपला पोहचवणाऱ्या मनोहर पर्रीकर यांच्यातील क्षमतेचा प्रत्यय आला होता. महाजन व गोपीनाथ मुंडे यांनी गोव्यात सरकार भाजपचे स्थापन करण्यासाठी सर्वपरीचे प्रयत्न सुरु केले.


मनोहर पर्रीकर यांना पाठींबा दिला व पक्षातर्फे लागेल ती सगळी मदत पुरवली गेली.


   याचाच परिणाम गोव्यात येत्या दहा वर्षात भाजपच सरकार आलं व मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री बनले. आपल्या साधेपणा व सच्चेपणासाठी ओळखले जाणारे मनोहर पर्रीकर पुढे जाऊन देशाचे संरक्षणमंत्री देखील बनले. सर्जिकल स्ट्राईकसारखे मोठे ऑपरेशन त्यांच्याच कारकिर्दीत घडले. रामजन्मभूमी व रथयात्रा आंदोलनाने फक्त २ खासदारांचा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीला देशात  सत्तेपर्यंत पोहचवल पण त्या पेक्षाही महत्वाच म्हणजे लाखो कार्यकर्ते या आंदोलनात घडले. नरेंद्र मोदी, मनोहर पर्रीकर यांच्यासारखे हिरे देखील पक्षाला याच आंदोलनात मिळाले.


अगदी कालपर्यन्त भाईंना आव्हान देण्याची टाप कोणाच्यातच नव्हती.


   दिगंबर वाघ                


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏