बेरोजगार युवक-युवतींसाठी ८ ते १२ जुलै पर्यंत मेळावा

बेरोजगार युवक-युवतींसाठी  ८ ते १२ जुलै पर्यंत मेळावा



पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा सुमारे १७ हजार रोजगारांच्या संधी उपलब्ध


 मुंबई प्रतिनिधी :  मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील कुशल तसेच अकुशल उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. ८ जुलै ते १२ जुलै,२०२० दरम्यान करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी जवळपास १६ हजार ७२६ रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने केले आहे.


     मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वांद्रे, मुंबई यांचेकडील मुंबई शहर, मुंबई उपनगर तसेच ठाणे येथील विविध पायाभूत प्रकल्पांमध्ये गवंडी, सुतारकाम, फीटर (स्टील फिक्सींग), फीटर (बार बेंडींग), वेल्डर, इलेक्ट्रीशियन, वायरमन अशा कुशल तसेच अकुशल स्वरुपाच्या रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.


      सदर संधी ‍ जिल्ह्यातील नोंदणीकृत उमेदवारांना उपलब्ध होण्याकरीता मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांमार्फत दिनांक  ०८ जुलै २०२० ते १२ जुलै, २०२० दरम्यान ऑनलाईन पद्धतीने  ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.  या ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये नियोक्त्यांकडून उमेदवारांच्या मुलाखती स्काईप, व्हॉट्सॲप आदींच्या माध्यमातून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेण्याचे नियोजन आहे.


       सदरच्या ऑनलाईन मेळाव्यामध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदविलेल्या रजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्ड ने लॉगीन करावे व पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा यावर क्लिक करून मुंबई उपनगर जिल्ह्यातील उमेदवारांनी मुंबई उपनगर जिल्हा निवडून उपलब्ध कंपनीला नोकरीसाठी खालीलप्रमाणे अर्ज करावा.


            Employment ->Job Seeker login with Registration no.& Password->Pandit Dindyal Upadhyay Job Fair->District Mumbai Suburban->(View Job Fair Detail) Vacancy Listing (View Company Vacancies)->Click on I Agree-> Apply for suitable Vacancies या पद्धतीने सहभाग नोंदवावा. मुंबई शहर जिल्ह्यातील उमेदवारांनी मुंबई शहर जिल्हा निवडून उपलब्ध कंपनीला नोकरीसाठी पुढीलप्रमाणे अर्ज करावा. Employment ->Job Seeker login with Registration no.& Password->Pandit Dindyal Upadhyay Job Fair->District Mumbai City->(View Job Fair Detail) Vacancy Listing (View Company Vacancies)->Click on I Agree-> Apply for suitable Vacancies. सदर मेळाव्यामध्ये उमेदवार एकापेक्षा जास्त कंपनीचा पर्याय निवडू शकतो.


       वेब पोर्टलवर रोजगार मेळाव्यात सहभाग घेताना काही अडचण उद्भवल्यास मुंबई शहरच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी दूरध्वनी क्र. २२६२६३०३ किंवा या ई-मेल-mumbaicity.employment@gmail.com आणि मुंबई उपनगरच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी दूरध्वनी क्र. २२६२६४४० किंवा या ई-मेल-mumbaisuburbanrojgar@gmail.com वर संपर्क साधावा.


              दिगंबर वाघ  


                  कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏