किनार पट्टीवर असणाऱ्या गावांना मोठ्या प्रमाणावर त्रास

किनार पट्टीवर असणाऱ्या गावांना मोठ्या प्रमाणावर त्रासरत्नागिरी गुहागर अनंत सोलकर 


     सध्या हवामानात होऊ घातलेला बदल .वाढते पर्जन्यमान ...:आलेले (निसर्ग वादळ )याचा फटका कोकण किनार पट्टीला मोठ्या प्रमाणात होत आहे .परंतु आता सागरी किनार पट्टीवर उधानाच्या वेळी समुद्राचे पाणी मर्यादा रेषेच्या आत सरकू लागले आहे त्यामुळे कोकणातील सागरी किनार पट्टीवर असणाऱ्या गावांना त्याचा त्रास  मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागत  आहे  त्याशिवाय  घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे .घरांच्या भिंती खचून जात आहेत . गुहागर तालुक्यातील वेळनेश्वर साखरीआगार नरवण कारूळ इत्यादी गाव या हद्दीत मोडत आहेत. हा लाटांचा धोका रोखायचा  असेल तर या किनारपट्टी वर पक्क्या बंधाऱ्याची गरज भासणार आहे .त्यासाठी वेलनेश्वर गावचे स्थानिक रहिवासी  चैतन्य धोपावकर हे गेली कित्येक वर्ष बंधाऱ्यासाठी पाठपुरावा करत आहेत परंतु शासन मात्र यावर काहीच विचार करताना दिसत नाही. समुद्राच्या काठी मोठया प्रमाणात कोळी बांधवांची वस्ती आहें परंतु आज या सागरी लाटांचे पाणी संपूर्ण घरात पाणी शिरल्याने जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे घरी साठवून ठेवलेल्या वस्तू अन्न धान्य यांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे


       दिगंबर वाघ  


        कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏