शिक्षक भारतीचे एकदिवसीय आंदोलन

शिक्षक भारतीचे एकदिवसीय आंदोलन



शिक्षक भारतीचे ३ जुलै २०२० रोजी एक दिवसाचे आंदोलन


मुंबई प्रतिनिधी अनंत सोलकर


      शिक्षक भारती ही राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची शासन मान्यता प्राप्त संघटना आहे. राज्य शासकीय निमशासकिय कर्मचारी संघटना समन्वय समितीची सदस्य आहे. समन्वय समितीने पुकारलेल्या राज्यव्यापी  आंदोलनात शिक्षक भारती संघटना सहभागी  होत आहे. या आंदोलनात शिक्षक भारती संघटना राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन मागण्यांचे निवेदन देणार आहे, अशी माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली. 


आंदोलनातील मागण्या
१) कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मोबाइलऐवजी टेलिव्हिजनचा वापर सुरु करा.
२) ऑनलाइन शिक्षण प्रभावीपणे देण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करा.
३) विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाची साधने उपलब्ध करून द्या. (टॅबलेट, ऍन्ड्रॉइड फोन)
४)विनाअनुदानित व रात्रशाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके द्या.
५) कोविड ड्युटीवर मरण पावलेल्या शिक्षक शिक्षकेतरांना ५० लाखांची मदत तातडीने द्या.
६) कोविड ड्युटीवर कोरोनाची लागण झाल्यामुळे झालेल्या उपचाराचा खर्च तातडीने द्या.
७) कोविड ड्युटी करणाऱया सर्व शिक्षक शिक्षकेतरांना कार्यमुक्त करून त्यांचा वापर ऑनलाइन शिक्षणात करा.
८) कोविड ड्युटी केलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱयांना बदली रजा मंजूर करून त्याची सेवापुस्तिकेत नोंद घ्या.
९) कोविड ड्युटी करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतरांना प्रोत्साहन भत्ता द्या व विशेष वेतनवाढ लागू करा.
१०) शाळा सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीवर न टाकता त्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासन आणि स्थानिक प्रशासनावर द्या. 
११) शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळांचे सँनिटायझेशन करा. शाळांना थर्मल स्कॅनिंग मशीन, सॅनिटायझर, मास्क हॅण्डग्लोज इत्यादी  सर्व साहित्य उपलब्ध करून द्या.
१२) कोरोना काळात विद्यार्थ्यांना वर्कबुक व अॅक्टिव्हिटी बुक द्या.
१३) कोरोनामुळे स्थलांतरित गरीब, दलित, मागासवर्गीय व भटक्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील  शाळेत विनाअट  प्रवेश द्या.
१४) कोरोना काळात अनुदान, पगार, महागाई भत्ते इत्यादींमध्ये कपात करू नका.
१५) मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतरांना शाळेतील उपस्थिती शाळा सुरू होईपर्यंत बंधनकारक करू नका.


                 दिगंबर वाघ
          कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८
 


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏