अखेर सामाजिक न्याय मंत्र्यांनी न्याय दिला

३०३विद्यार्थ्यांच्या फेलोशिफला मंजुरी दिल्याबद्दल धनंजय मुंडे यांचे शतशः आभार मानले..


 "सप्तरंगचा इम्पॅक्ट" सप्तरंगने ५ जुलै २०२० रोजी याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते.पुणे प्रतिनिधी : बार्टीने २०१८ या वर्षात पात्र ४०८ विद्यार्थ्यापैकी १०५ विद्यार्थ्यांना ३ मार्च २०२० रोजी फेलोशिप मंजूर केली. त्यामुळे आम्ही सर्व संशोधक विद्यार्थ्यांनी ६ मार्च रोजी आपली मंत्रालयात भेट घेतली होती. त्यावेळी येत्या ८ दिवसांत उर्वरित सर्व ३०३ विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर केली जाईल, असे आश्वासन दिले. परंतु ४ महिने उलटले तरीही फेलोशिप मंजूर करण्यात आली नाही. त्यातच अनेकवेळा आपणास निवेदन दिले आहे. तरीदेखील आपण दखल घेतली नाही. त्यामुळे आता ७ जुलै २०२० रोजी मंत्रालयात ( मुंबई) होणाऱ्या बैठकीत आपण किमान ३०३ विद्यार्थ्यांना बार्टीची फेलोशिप मंजूर करून यादी बार्टीच्या संकेतस्थळावर जाहिर करण्याचे आदेश बार्टीच्या महासंचालकांना देऊन मागासवर्गीय संशोधक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहेत.


       ४ जुलै २०२० रोजी या मागण्यासाठी करणार होते उपोषण !!


✒️ २०१८ या वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी पात्र ४०८ पैकी            मंजूर १०५ विद्यार्थी वगळता उर्वरित ३०३ विद्यार्थ्यांनाही फेलोशिप मंजूर करून यादी बार्टीच्या            संकेतस्थळावर तत्काळ जाहिर करा.


✒️ फेलोशिपसाठीची ४० वर्ष वयाची अट रद्द करावी. नेट आणि सेटची पात्रता ठेवू नका,                        रजिस्ट्रेशनसाठी शैक्षणिक वर्षाची अट ठेवू नका.


✒️ बार्टीने २०१७ व २०१९ व २०२० या शैक्षणिक वर्षातही फेलोशिपची जाहिरात काढली नाही.


       राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेली पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थाच्या माध्यमातून वर्ष २०१२ पासन अनुसूचित जातीच्या एम.फिल व पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सामाजिक संशोधन अधिछात्रवृत्ती, सावित्रीबाई फुले राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती, ज्योतीराव फुले राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती आणि छत्रपती राजर्षी शाहू संशोधन अधिछात्रवृत्ती या नावाने फेलोशिप दिल्या जातात. परंतु २०१२ पासून फेलोशिप दिलेल्या विद्यार्थ्यांची दरवर्षीची संख्या अगदी नगन्य आहे. बार्टीने २०१७ पर्यंत केवळ ५६७ विद्यार्थ्यांना ही फेलोशिप मंजूर केली आहे.       विशेषत : राज्यभरातील विविध विद्यापीठात दरवर्षी एम.फिल व पीएचडी करणाऱ्या अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. परंतु बार्टीने अगदी बोटावर मोजण्याएवढ्याच संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्याच विचारांना खोडा घालण्याचे काम केले आहे.


      त्यामुळे अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांना जाणून बुजून उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम बार्टीचे अधिकारी व राज्य सरकार करत आहे. बार्टीने आता वर्ष २०१८ मध्ये फेलोशिपसाठी पात्र सर्वच ४०८ विद्यार्थ्यांपैकी १०५ विद्यार्थ्यांना मंजूर केली. उर्वरित ३०३ विद्यार्थ्यांना तत्काळ मंजूर करून यादी बार्टीच्या संकेतस्थळावर जाहिर करावी. तसेच ती एम. फिल व पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना सलग युजीसीप्रमाणे पाच वर्ष द्यावी. तसेच नेट व सेटची कुठलीही अन्य अट न टाकता वर्ष २०१९ पासून नियमित दरवर्षी १ हजार अनुसूचित जातीच्या एम.फिल व पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी. त्यातच बार्टीने २०१७ या वर्षात ही जाहिरात काढली नाही. आता २०१९ व २०२० या शैक्षणिक वर्षाची बार्टीने तत्काळ फेलोशिपची जाहिरात काढून अर्ज मागवून घ्यावेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन अधिछात्रवृत्ती सोडता अन्य बंद केलेल्या चारही फेलोशिप सुरु कराव्यात. सारथीने तब्बल २० फेलोशिप सुरु केल्या आहेत. तर अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी केवळ एकच फेलोशिप चालू आहे. येत्या ८ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास लोकशाहीच्या मार्गाने 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती २०१८' संशोधक विद्यार्थी समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने लॉकडाऊन संपताच मंत्रालयासमोर किंवा बार्टीच्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार होते.आता या सर्व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले असून तात्काळ ही योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोचावी एवढीच अपेक्षा व्यक्त केली आहेत. बार्टी  व मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला परंतु प्रतिक्रिया देण्यासाठी कोणी ही तयार नाहीत.


🎤  सप्तरंगच्या बातमीमुळे आम्हाला खुप मोठा फायदा झाला असून आमचा आवाज मंत्रालयातील मंत्री आणि अधिकाऱ्यांनापर्यंत पोहचवला आहे. त्यामुळे त्यांचे मनःपूर्वक आभार !!
       आता मंत्री महोदय धनंजय मुंडे यांनी मंजूरी दिली असून अधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ अंमलबजावणी करावी . त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा फायदा होईल. ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आम्हाला मदत केली त्या सर्वांचे खुप खुप धन्यवाद !!  -- भरत हिवराळे औरंगाबाद.


       दिगंबर वाघ  


        कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏