कोकणातील चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाला १०० बस उपलब्ध
मुंबई प्रतिनिधी अनंत सोलकर : कोकणातील चाकरमान्यांसाठी गुहागर एसटी आगार मार्फत परतीच्या प्रवासासाठी खास जादा एसटी बसची सुविधाः कोकणातील चाकरमान्यांसाठी एसटी आगारातून या वर्षी 100 बस व्यवस्था चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी करण्यात आलेली आहे सध्या कोरोना या महामारीचा पादुर्भाव असताना खासगी बस चालकांचे वाढते दर आणि त्यातून प्रवाशांची होणारी लूटमार या गोष्टीला आळा बसण्यासाठी गुहागर आगारातून खासकरून विशेष जादा एसटी गाड्या सोडण्यात येत आहेत आतापर्यंत बुकिंग झालेल्या एसटी बस खालील प्रमाणे आहेत.
ग्रुप बुकिंग आतापर्यंत जवळ-जवळ 50 बस कुर्ला- परेल- बोरीवली- नालासोपारा- विरार-विठ्ठलवाडी इत्यादी एसटी डेपो पर्यंत करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती गुहागर आगार वाहतूक निरीक्षक आर जे पवार यांनी दिली आहे, अजूनही ग्रुप बुकिंग सुरू ठेवण्यात आलेली आहे .गुहागर डेपोच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पंचनामा व सप्तरंग या वृत्तपत्रां मार्फत त्यांचे आभार देखील व्यक्त करण्यात आले आहेत.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏