सीआयआय हॉस्पिटल टेक - 2020 चे उद्घाटन

डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरोना संकटावर मात करू


     --सुभाष देसाईमुंबई प्रतिनिधी : डिजिटल तंत्रज्ञान आणि साधनांच्या मदतीने आपण कोरोनासारख्या संकटावर सहज मात करू शकतो, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.कॉन्फेड्रेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिजच्यावतीने (सीआयआय) आयोजित ‘सीआयआय हॉस्पिटल टेक-२०२०’ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी  देसाई बोलत होते. यावेळी ब्रिटीश उप उच्चायुक्त अँलन गेमेल, डॉ. रमाकांत देशपांडे, सुधीर मेहता, जॉय चक्रवर्ती आदी उपस्थित होते.


     देसाई म्हणाले की, राज्यशासन कोविड संकटावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोविड चाचण्यासाठी प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यात आली. आयसीयु बेडस् मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा देखील वाढविला आहे. येत्या काळात नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रुग्णांची चाचणी केली जाईल. प्रतिदिन सुमारे दीड लाख चाचण्या करण्याचा शासनाचा मानस आहे.


   दिगंबर वाघ             


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..