महाआवास त्रैमासिकाच्या प्रकाशन करण्यात आले

विविध घरकुल योजनांची माहिती देणाऱ्या 'महाआवास' त्रैमासिकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन मुंबई प्रतिनिधी : ग्रामविकास विभागाच्या राज्य व्यवस्थापन कक्ष - ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या "महाआवास" त्रैमासिकाच्या जुलै ते सप्टेंबर 2020 या पहिल्या अंकाचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल प्रकाशन करण्यात आले. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यावेळी ऑनलाईन सहभागी झाले होते, तर शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, मुख्य सचिव  संजय कुमार, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, राज्य व्यवस्थापन कक्ष - ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ. राजाराम दिघे आदी मान्यवर  यावेळी उपस्थित होते.


 दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..