कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा मंत्री छगन भुजबळ यांचा निर्णय
कार्यकर्त्यांनी गर्दी न करता आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी : देशात आणि राज्यात कोरोना महामारीने थैमान घातल्यामुळे दि.१५ ऑक्टोबर २०२० रोजी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबर २०२० रोजी कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयात गर्दी न करता आपापल्या विभागात आरोग्यविषयक सामाजिक उपक्रम तसेच जनजागृतीपर उपक्रम राबवावेत, असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.
गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळापासून राज्यात आणि जगभरात कोरोना महामारीने थैमान घातल्याने अनेक नागरिक या आजाराचा सामना करीत आहेत. त्यामुळे राज्यभरातून शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली सामाजिक जबाबदारी म्हणून गर्दी न करता आरोग्यविषयक जनजागृतीपर व सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८
माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..