आंब्रड येथील धरणाचे काम तातडीने पूर्ण करावे

आंब्रड येथील धरणाचे काम तातडीने पूर्ण करावे


- विधानसभा अध्यक्ष नाना पटोले



मुंबई प्रतिनिधी :सिंधूदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील आंब्रड येथील 2016 मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या धरणाचे काम तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दि. 15 ऑक्टोबर 2020 रोजी विधानभवन येथील दालनात आढावा घेतला. येत्या उन्हाळ्यापर्यत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याबाबत शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. आमदार वैभव नाईक यांनी याबाबत निवेदन सादर केले होते. यावेळी मुख्य अभियंता सु. पां. कुशिरे, मृद व जलसंधारणचे उप सचिव वि. म. देवराज,  अधीक्षक अभियंता, ठाणे सु. स. खांडेकर, कार्यकारी अभियंता य. ल. थोरात व इतर अधिकारी व प्रकल्पबाधित शेतकरी उपस्थित होते.


      सदर धरणाचे काम पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांचा सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यास मदत होणार आहे.  या बैठकीत सुरु असलेल्या विहिरींच्या कामाबाबत चर्चा करण्यात आली.  अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्यास याबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे पाठवून प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष  पटोले यांनी दिले.


 दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..