अफगाणिस्तानच्या वाणिज्यदूत यांची छगन भुजबळशी भेट

अफगाणिस्तानच्या मुंबईतील  वाणिज्यदूत झाकिया वर्दक यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट



मुंबई प्रतिनिधी : अफगाणिस्तानच्या मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत झाकिया वर्दक यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची मंत्रालय येथे सदिच्छा भेट घेतली.भुजबळ म्हणाले, अफगाणिस्तानशी असलेले सौहार्दाचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र शासन उत्सुक आहे. महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसंदर्भातील  माहिती अफगाणिस्तानला धोरणे बनविताना निश्चितच उपयुक्त ठरतील. राज्यातील विविध विकासकामांबाबत राबविण्यात येणाऱ्या  उपक्रमाची माहिती  यावेळी भुजबळ यांनी दिली .


     अफगाणिस्तानची मुंबईतील पहिली महिला वाणिज्यदूत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगून झाकिया वर्दक यांनी आपल्या कार्यकाळात भारत आणि अफगाणिस्तानमधील उद्योग-व्यापार वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे संगितले.


 दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..